Crime News : मित्राने 16 वर्षीय मुलीवर झाडल्या गोळ्या, कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : होलिका दहनाच्या दिवशी 16 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या मित्राने मुलीवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.  

Updated: Mar 7, 2023, 08:36 AM IST
Crime News : मित्राने 16 वर्षीय मुलीवर झाडल्या गोळ्या, कारण ऐकून बसेल धक्का title=
Crime News 16 year old girl shot at by friend delhis news in marathi

Delhi Crime News in Marathi : होलिका दहनाला दिल्ली शहरात गालबोट लागलं आहे. दिल्लीतील सुभाष पार्क नंद नगरीमध्ये (Subhash Park in Nand Nagri) एका 16 वर्षीय मुलीवर सोमवारी (6 मार्च)ला शेजारच्या मुलाने प्राणघातक हल्ला केला आहे. रागाच्या भरात या तरुणाने  16 वर्षीय मुली बंदुकीने गोळ्या झाडल्या आहेत. हा तरुण त्या मुलीच्या घराच्या शेजारी (16 year minor Girl shot by her friend ) राहत होता आणि तिचा मित्र होता. या घटनेनंतर परिसरात भयान शांतता पसरली आहे. दरम्यान मैत्रिणीवर गोळी झाडल्यानंतर (Delhi Murder Case) त्या मुलाने तिथून पळ काढला आहे. दिल्ली पोलीस (DELHI POLICE) त्या तरुणाचा शोध घेत आहेत. (Crime News 16 year old girl shot at by friend delhis news in marathi )

कधी घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या घटनेविषयी माहिती सोमवारी 6 मार्चला रात्री 8.27 वाजता मिळाली आहे. तरुणीवर तिच्या शेजारी राहणारा मित्र कासिमने गोळ्या झाडल्या. मुलीच्या खांद्याला गोळी लागली असून तिच्यावर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित तरुणीची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला शोधण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आल्याच पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय परिसरात पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलीस कसून तपासणी करत आहेत.