मनाली : जगाप्रमाणेच भारतावरील कोरोना संकट टळण्याचे नाव घेत नाहीय. हिमाचल प्रदेशच्या लाहौल डोंगराळ भागातील एक पूर्ण गाव कोरोना संक्रमित झालंय. यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये सामुदायिक संक्रमणावर चर्चा होऊ लागली.
लाहौल घाटीच्या थौरांग गावातील सर्व नागरिक कोरोना पॉझिटीव्ह झालेयत. लाहौल स्पीटीमध्ये परिस्थिती खूप खराब झालीय. इथे कोरोना संक्रमित असलेल्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय.
लाहौल स्पिटी जिल्ह्यामध्ये सुरुवातीचे २-३ महिने कोरोनाची एकही केस नव्हती. पण सध्याचे वातावरण नियंत्रणाच्या बाहेर आहे. कोरोना प्रादुर्भावापासून हिमाचल प्रदेश काही दिवस वाचला. पण ज्यापद्धतीने कोरोना संक्रमण वाढले त्यामुळे प्रशासनासमोरचे आव्हान वाढलंय.
लाहौल स्पीटी जिल्ह्याच्या याच गावात ईमानदारीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर कोरोनापासून वाचले जाऊ शकते हे ५२ वर्षाच्या इसमाने दाखवून दिले. भूषण ठाकूर हे गावातील असे एक व्यक्ती आहेत जे कोरोनापासून दूर आहेत. भूषण यांची पत्नी आणि पूर्ण परिवार कोरोना पॉझिटीव्ह आहेत.
लाहोल घाटीच्या थौरांग गावातील सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. यानंतर सामुदायिक संक्रमण होण्याच्या प्रकारातही वाढ होतेय.
वाढते कोरोना संक्रमण पाहता प्रशासनाने पर्यटकांना येण्यास बंदी घातलीय. रोहतांग सुरुंगच्या उत्तरेकडे पर्यंटकांना जाण्यास परवानगी नाही.