Vaccine : 12 ते 14 वर्षाच्या मुलांना या तारखेपासून मिळणार वॅक्सीन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ते 14 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे.

Updated: Mar 14, 2022, 03:54 PM IST
Vaccine : 12 ते 14 वर्षाच्या मुलांना या तारखेपासून मिळणार वॅक्सीन title=

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ते 14 वर्षाच्या मुलांना 16 मार्चपासून लसीकरण केलं जाईल असं म्हटलंय. मुलांना कार्बेवॅक्सची (carbewax) लस दिली जाणारे. ही लस बायोलॉजिकल ई-कंपनीने बनवली आहे. मुलांसाठी कोरोना लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या पालकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्वीट करत म्हटलं की, सगळ्यांनी मुलांना कोरोनाची लस नक्की द्यावी.

या सोबतच प्रिकॉशन डोसबाबत देखील काही नियम बदलण्यात आले आहेत. आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की, 60 वर्षापेक्षा अधिकच्या व्यक्तींना कोरोनाची तिसरी लस घेता येणार आहे. याआधी फक्त फ्रंट लाईन वर्कर आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना ही लस दिली जात होती.

मुलांसाठी कार्बेवॅक्स

आरोग्य मंत्रालयाच्या मते, 12 ते 14 वर्षाच्या मुलांना कार्बेवॅक्स दिली जाणार आहे. कार्बेवॅक्स एक रिकॉम्बिंनेंट प्रोटीन सब-यूनिट वॅक्सीन आहे. ही लस कोरोना व्हायरसवरील मिळणाऱ्या प्रोटीनपासून बनवली आहे.