BF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला

coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे.  यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे. 

Updated: Dec 23, 2022, 10:21 AM IST
BF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला  title=

Covid-19 BF.7 Variant: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (corona ) कहर केला असून एका दिवसात 5000 कोरोनाबाधित रूग्णांना जीव गमवावा लागला. याचपार्श्वभूमीवर इतर देशांमधील कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात काल (22 डिसेंबर) ला बैठक झाली असून नागरिकांना कोरोनाचे (Corona Guidelines)  मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे आवाहन केले आहेत. त्याचदरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) देखील देशातील नागरिकांसाठी एक मोलाचा सल्ला जारी केला आहे.   

या बैठकीत IMA ने,  नागरिकांना लग्न सोहळा, राजकीय कार्यक्रम किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक मेळावे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वाचा : आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर 

विमानतळांवरही रॅन्डम चाचणीची तयारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. यामध्ये मंत्रालयाला रॅन्डम चाचणीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. विमानातील एकूण प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांचे रॅन्डम नमुने कोविडच्या तपासणीसाठी जातील याची खात्री करावी लागेल. एअरलाइन्स अशा प्रवाशांची ओळख पटवतील ज्यांना सॅम्पलिंगनंतर विमानतळ सोडण्याची परवानगी दिली जात आहे. पॉझिटिव्ह सॅम्पल टेस्टिंग असलेले नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील.

72 तासांपूर्वीचा अहवाल देखील अनिवार्य

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेश प्रवासापूर्वी 72 तास आधी केलेल्या RT-PCR चाचणीचा तपशील देण्यासाठी किंवा चीन आणि इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी संपूर्ण लसीकरणाचा पुरावा देण्यासाठी 'हवाई सुविधा' फॉर्ममध्ये सुधारणा केली आहे. ते अनिवार्य करण्याचा विचार करण्यात येणार आहे. 

तसेच दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व राज्य आपापल्या पद्धतीने उपाययोजना करत असल्याचं पहायला मिळतंय. राज्य सरकार टास्क फोर्स (Task Force) स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.