COVID 19 काळातही या क्षेत्रात नोकरीची संधी, तुम्हीही करू शकता अप्लाय

एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जिथे लोकांची नोकरी जातेय...तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा पर्यायांना बनवा आपली नोकरीची संधी!

Updated: Aug 25, 2021, 04:50 PM IST
COVID 19 काळातही या क्षेत्रात नोकरीची संधी, तुम्हीही करू शकता अप्लाय title=

मुंबई: कोरोना काळात अनेक उद्योग आणि व्यवसाय बंद झाले. नोकऱ्या गेल्या तर काही नव्या स्वरुपात उद्योगांना चालना मिळाली आहे. कोरोनामुळे अनेक सेक्टरला मोठा फटका बसला आहे. अशा कठीण काळात किती वेळ हातावर हात ठेवून बसणार असा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्या कोणत्या क्षेत्रात सध्या नोकरीच्या संधी आहेत आणि त्याचा फायदा कसा आपल्याला करून घेता येईल याचा विचार कऱणं गरजेचं झालं आहे. 

सध्या अशी काही क्षेत्रं आहेत जिथे लोकांची आवश्यकता वाढली आहे त्यामुळे कोणतंही काम छोटं मोठं असं मनात न आणता तुम्ही तिथे प्रयत्न करू शकता अशी कोणती क्षेत्रं आहेत जिथे नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात जाणून घेऊया.

कोरोना काळात हेल्थ सर्व्हिस सर्वात महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे लोकांची गरज लक्षात घेऊन तिथे काम करण्यासाठी लोकांचीही गरज वाढली आहे.  हेल्थकेयर प्रोफेशनल्स, सपोर्टिंग स्टाफ, हेल्थकेयर असिस्टन्टस, फॉर्मेसी टेक्निशियन, डेन्टल असिस्टन्ट, लॅब असिस्टन्ट, होम हेल्थ केअर असिस्टन्ट अशा अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. 

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक ई कॉमर्स बेवसाईटकडे खरेदी करण्यासाठी वळले आहेत. त्यामुळे ई कॉमर्स वेबसाईटमध्ये बिजनेस एसोसिएट्स, सप्लाई चेन एसोसिएट्स, पॅकेज हॅण्डलर्स आणि पॅकेज हॅण्डलर्सची आवश्यकता असते. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता. 

ऑनलाइन शॉपिंगमुळे डिजिटल मार्केटिंगची गरज वाढली आहे. चांगल्या सेवा किंवा वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता असते. या क्षेत्रामध्ये डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर, सर्च इंजन ओप्टेमाइजर स्पेशलिस्टची आवश्यकता असते. डिजिटल स्ट्रॅटजी, मार्केटिंग अशा ठिकाणीही तुम्ही अर्ज करू शकता. 

ई  एज्युकेशन आणि डाटा सायन्स क्षेत्रातही नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आता तरुणांना किंवा बेरोजगार असणाऱ्यांना नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकतो.