तुम्हाला कोरोना झाला होता, तरीही पुन्हा पॉझिटिव्ह व्यक्तीशी तुमचा संपर्क नको...नाहीतर

कोविड -19 अँन्टीबॉडी कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णात किती काळ टिकते? एका अंदाजानुसार हा कालावधी 3 महिने मानला जातो.

Updated: May 5, 2021, 04:39 PM IST
तुम्हाला कोरोना झाला होता, तरीही पुन्हा पॉझिटिव्ह व्यक्तीशी तुमचा संपर्क नको...नाहीतर title=

मुंबई : कोविड -19 अँन्टीबॉडी कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णात किती काळ टिकते? एका अंदाजानुसार हा कालावधी 3 महिने मानला जातो. परंतु त्याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही आणि सध्या त्याबद्दल संशोधन सुरु आहे. काही ठिकाणी असे आढळले आहे की, काही लोकं कोरोनापासून बरे झाले आहेत तरी, त्यांना दोन आठवड्यांनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे हे खूप धक्कादायक आहे. कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांना वाटते की, ते आता सुरक्षित आहे, परंतु असे नाही.

गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेपेक्षा, यावेळीच्या लोटेमध्ये खूप मोठा फरक आहे. मागील वेळी असा अंदाज केला गेला होता की, कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णामध्ये 3 महिन्यांपर्यत अँन्टीबॉडीज असतात, त्यामुळे त्यांना पुन्हा संसर्ग होत नाही. परंतु यावेळी डबल म्यूटेन्ट कोरोनाने सर्व काही बदलले आहे. यामध्ये काही रुग्ण असे आढळले आहेत की, जे दोन आठवड्यांनंतर बरे होऊन निगेटिव्ह झाले. परंतु नंतर ते कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आले तेव्हा ते पॅाझिटिव्ह आले. हे आश्चर्यकारक आहे. डबल म्यूटेन्टमुळे हे झाले असे सांगितले जात आहे.

यावेळची परिस्थिती वेगळी

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी पसरलेल्या संक्रमणामध्ये 15 दिवसांच्या तीव्रतेचा अंदाज लावला जात होता. एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास, विषाणू पहिल्या 3 दिवसांत शरीरात स्वतःला मल्टिप्लाय करतो, तीन दिवसांनंतर, रुग्णाला रोगाची लक्षणे दिसतात. जर लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर, 14 दिवसांपर्यंत लोकं निरोगी होतात. त्यांच्यात जवळजवळ 3 महिन्यांपर्यंत अँन्टीबॉडीज तयात होतात, ज्यामुळे नवीन संसर्ग होत नाही. पण यावेळी परिस्थिती बदलली आहे.

कोरोनाने फॉर्म बदलला

 

डॉक्टरांच्या मते, आता ही 14 दिवसांची गोष्ट नाही. आता असे बरेच रुग्ण आहेत ज्यांच्या तीन दिवसात मृत्यू होत आहे. डॉक्टर सीटी स्कॅन आणि इतर कोणतीही तपासणी करण्याच्या प्रयत्नात आसतात, तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. पहिल्या किंवा दुसर्‍या दिवसापासून रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी, जास्त प्रमाणात संक्रमण जरी झाले तरी रूग्णांच्या जगण्याची शक्यता होती. परंतु यावेळी ही शक्यता जवळजवळ शून्य झाली आहे. कोरोना विषाणूवर गेल्या वर्षी केलेल दावे खोटे असल्याचे सिद्ध होत आहेत. कारण या विषाणूचे सतत बदलणारे स्वरूप. अशा परिस्थितीत व्हायरस विषयी दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत.

अँन्टीबॉडीजचा नियम बदलला

असे मानले जाते की, एकदा एखाद्यास विषाणूचा संसर्ग झाला तर त्याच्या शरीरात त्या विषाणूविरूद्ध अँन्टीबॉडीज तयार केले जातात. त्यामुऴे हा विषाणू शरीरात अँन्टीबॉडीज असल्यावर कोणालाही पुन्हा संसर्गित करणार नाही. परंतु ही वेळ मर्यादा प्रत्येक व्यक्तींच्या बाबतीत वेगळी असते. कारण अँन्टीबॉडीज एखाद्याच्या शरीरात 3 महिने असतात, तर काहींच्या शरीरात वर्षभर असतात.

तज्ञांचे मत

आता अशीही प्रकरणे समोर आली आहेत की, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर केवळ 15 दिवसात एखाद्याच्या शरीरात पुन्हा एकदा लक्षणे दिसू लागतात. टेस्टनंतर पुन्हा रीपोर्ट पॅाझिटिव्ह कसा येऊ शकतो? असे का? एखाद्याची इतक्या लवकर टेस्ट पॅाझिटिव्ह होऊ शकते का? याबद्दल नोएडाचे डॉक्टर वलेचा सांगतात, "हे अगदी शक्य आहे. आपल्या शरीराला जरी एकदा विषाणूची ओळख करुन दिली आणि त्याविरूद्ध अँन्टीबॉडीज तयार करुन तो उपचार सुरु करतो हे खरं आहे. परंतु पुढच्या वेळी तोच विषाणू परत आपले स्वरूप बदलून आला तर? तर आपले शरीर ते ओळखु शकणार नाही."

Immunity escape म्हणजे काय?

डॉ. वालेचा यांनी सांगितले की, कोरोना विषाणू सतत आपले रूप बदलत असतो आणि अशा परिस्थितीत व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आपल्याला पुन्हा इन्फेक्ट करू शकतो. आपले शरीर व्हायरसचे हे बदललेले रूप ओळखू शकत नाही आणि आपल्या शरीरात उपस्थित अँन्टीबॉडीज त्यास विरोध करू शकत नाहीत. याला वैद्यकीय संज्ञेमध्ये रोगप्रतिकार शक्ती असे म्हणतात. डॉक्टर वेलेचा असेही म्हणतात की, कदाचित हा विषाणू दुसर्‍यांदा आपणास इजा पोहोचवू शकणार नाही, परंतु तरीही सर्वांनी आवश्यक औषधे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे.