मुंबई : सध्या CORONA कोरोनाबद्दल सोशल मीडियावरची वेगवेगळी माहिती वाचून लोक प्रचंड घाबरले आहेत. पण कोरोना हा आजार किंवा हा व्हायरस मुळात काय आहे याचा विचार केला आहे का तुम्ही? चला तर मग, पाहूया हा आजार नेमका आहे तरी काय आणि यामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाणं अपेक्षित आहे. जेणेकरुन तुम्ही न घाबरता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी धाडस दाखवाल.
कोरोना नेमका काय आहे ?
कोरोना हा एक नवा विषाणूजन्य आजार आहे
कोरोना कुठून आला ?
कोरोना चीनमधील वटवाघूळ, सापांच्या जातींमधून आल्याचा तर्क आहे.
कोरोनाची लक्षणं काय ?
सर्दी, नाक गळणं, घसा दुखणं, खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत.
कोरोनाचा जंतूसंसर्ग कसा होतो ?
कोरोना बाधित व्यक्ती शिंकल्यानं, खोकल्यानं याचा जंतूसंसर्ग होतो
कोरोना झाल्यावर कुठल्याही परिस्थितीत माणूस मरतो का ?
नाही, योग्य वेळी उपचार झाल्यास यात मृत्यू होत नाही. यामध्ये मृत्यूचं प्रमाण फक्त २ टक्के इतकं आहे.
यासाठी कोणतं मास्क वापरायचं ?
कोरोनासाठी संशयित रुग्णांनी N95 मास्क वापरावं. प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनीही मास्क वापरावं. शिवाय डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावं. निरोगी, सर्दी-खोकला नसलेल्यांना मास्कची गरज नाही.
चिकन, मटण खालेलं चालतं का ?
बिनधास्त खा. पूर्णपणे शिजवलेलं आणि ताजं खा.
काय काळजी घ्याल ?
शक्यतो चेहऱ्याला लावणं टाळा. हात धुवून मगच चेहऱ्याला स्पर्श करा.
गरोदर स्त्रियांनी काय काळजी घ्यावी ?
गर्दीत जाणं टाळा, बाहेर पडताना मास्क लावा. थोडी जरी सर्दी झाली, तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या
लहान मुलांबाबत काय काळजी घ्यायची ?
आजारी मुलांना शाळेत पाठवू नका. मुलांना स्वच्छतेचं योग्य प्रशिक्षण द्या
कोरोनावर आयुर्वेदिक, होमियोपॅथिक औषध आहे का ?
आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिमध्ये कोरोनावर औषध नाही