कोरोनाच्या मृतांचा आकडा वाढला; आणखी एकाचा मृत्यू

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 9वर पोहचला आहे.

Updated: Mar 23, 2020, 09:29 PM IST
कोरोनाच्या मृतांचा आकडा वाढला; आणखी एकाचा मृत्यू  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 69 वर्षीय तिबेटियन शरणार्थीचा मृत्यू झाला. हिमाचलप्रदेशमधील टांडा येथील रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झालाय. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आर.डी धीमान यांनी याबाबत माहिती दिली.

15 मार्च रोजी हा व्यक्ती अमेरिकेहून परतला होता. याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 

आतापर्यंत कोणत्या राज्यात किती कोरोना मृत्यू -

महाराष्ट्र-३
गुजरात-१
बिहार-१
दिल्ली-१
कर्नाटक-१
पश्चिम बंगाल-१
हिमाचल प्रदेश-१