नवी दिल्ली : जगभरातील कोरोना वायरसचे थैमान संपुष्टात येण्याच नाव घेत नाहीय. दरम्यान नवी दिल्ली येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. याशिवाय तेलंगणामध्ये देखील एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण इटलीहून आला होता. दुसरा इसम दुबईतून आला होता. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत असून दोघांची तब्येत ठिक असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
याआधी चीनहून आलेल्या भारतीय नागरिकांना मानसेर सेंटर येथे ठेवण्यात आले. तिथे त्यांची काळजी घेतली जात आहे. या रुग्णांना भेटण्याची परवानगी कोणाला दिली जात नाही.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात नव्याने ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्ये २,९१२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच नव्या रिपोर्टनुसार आणखी ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील कोरोनो विषाणू बाधितांचा आकडा जाहीर केला आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला कोरोनो व्हायरसचा संसर्ग होण्याचे कमी प्रमाण नोंदविले गेले. २०२ नवीन रुग्ण आढलेले आहेत. सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई प्रांतातील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजग्य रोगाला ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे.
चीननंतर कोरोना विषाणू जगभर पसरला आहे. आता चीनमध्ये हळूहळू कमी झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. हुबेईबाहेर फक्त सहा जणांना नव्याने लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. गतवर्षी चीनमधील हुबेई येथे कोरोना व्हायरसचा प्रसार झाला. ६० हून अधिक लोकांना याची लागण झाली होती. युरोप आणि काही देशात या व्हायरसचा प्रसार झाला आहे. इटली, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातही कोरोना बाधीत लोकांच्या मृत्यूच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, ६० वर्ष वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका आहे. कारण त्यांना आधीच विकनेस असतो. ते आजाराने अशक्त असतात त्यांना या व्हायरसचा धोका आहे.
सध्या जगभरात ४२ हजार ७६८ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामधील ३४ हजार ९५२ रुग्णांची प्रकृती ठीक आहे. तर ७८१६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत ३९ हजार ५१८ जणांना रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाने चीनमध्ये शुक्रवारी ४४ जणांचा मृत्यू झाला असून, ३२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियातही शुक्रवारी कोरोनाचे २३६ नवीन रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे दक्षिण कोरियात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २,०२२ वर पोहोचली. इटलीत विषाणूबाधितांची संख्या ६५० असून आतापर्यंत येथे ८ जणांचा बळी गेला आहे.