देशात 2 आठवड्यात दुप्पटीने वाढली कोरोनाच्या रुग्णांची संख्या

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी

Updated: May 19, 2020, 11:07 AM IST
देशात 2 आठवड्यात दुप्पटीने वाढली कोरोनाच्या रुग्णांची संख्या title=

मुंबई : देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आता देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग थांबत नाहीये. परिस्थिती अशी आहे की 12 दिवसातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

देशात लॉकडाऊन दरम्यानही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 25 मार्चपासून सुरू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता सुरू आहे. लॉकडाऊन दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाची तीव्रता वाढली आहे. त्याचबरोबर, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता एक लाखांच्या घरात गेली आहे. आज देशात कोरोनाच्या रुग्णांची एकूण 1 लाख 1 हजार 139 आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिला लॉकडाउन 25 मार्चपासून सुरू झाला. त्यानंतर देशात कोरोना विषाणूचे 606 रुग्ण संक्रमित झाले. पहिला लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपला. त्याच वेळी, जेव्हा 15 एप्रिल रोजी देशात दुसरे लॉकडाउन सुरू झाले तेव्हा देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11439 होती.

दुसरे लॉकडाउन देशात 3 मे पर्यंत चालले. पण कोरोना विषाणूचा संसर्ग थांबला नाही. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मेपासून देशात सुरू झाला. यावेळी, भारतात कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 42533 होती. तिसरा लॉकडाउन दोन आठवड्यांपर्यंत चालला आणि 17 मे रोजी तो संपला.

18 मेपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात चित्र वेगळे लॉकडाऊन 4 च्या पहिल्या दिवसापर्यंत देशात कोरोना विषाणूचे 96169 पॉझिटिव्ह रूग्ण होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या पहिल्या दिवसानंतर, देशात एक लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालेली दिसते आहे.