नवी दिल्ली : सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे देशात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. आता मात्र अनेक महिन्यांनंतर करोनाविरोधातील लढाईदरम्यान आशेचा किरण दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही नियमांचे पालन करणे गरजे आहे. प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. गेल्या २४ तासात देशात ३६ हजार ६०४ नवे रुग्ण आढळले असून हा आकडा गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे.
With 36,469 new #COVID19 infections, India's total cases surge to 79,46,429. With 488 new deaths, toll mounts to 1,19,502.
Total active cases are 6,25,857 after a decrease of 27,860 in last 24 hrs
Total cured cases are 72,01,070 with 63,842 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/YYENxUZlay
— ANI (@ANI) October 27, 2020
सोमवारी देशात कोरोनामुळे ४९० रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत भारतात १ लाख १९ हजार ४९६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली आहे.
त्याचप्रमाणे दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रूग्ण वाढत्या संख्येच्या तुलनेत कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या ६ लाख ३० हजार ५४६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ७२ लाख १ हजार ७० रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.