मुंबई : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसर्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंजाब सरकारने आणि कर्नाटक सरकारने कडक लॉकडाऊनचा (Karnataka Lockdown) निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यानंतर दिल्लीतही मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. दिल्लीतही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची नियमावली जारी करण्या आली आहे. (Corona crisis : Strict lockdown in Punjab and Karnataka)
पंजाब सरकारने सोमवारी संध्याकाळी संपूर्ण लॉकडाऊन (Complete Lockdown) जाहीर केले. आदेशानुसार संपूर्ण राज्यात दररोज सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यावेळी, केवळ आपत्कालीन सेवांशी जोडलेल्या लोकांनाच प्रवास करण्याची मुभा दिली जाईल. याशिवाय इतर सर्व काही 11 तास बंद राहणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ते सोमवारपर्यंत शनिवार आणि रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्विट केले की, कॅबिनेट बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर आम्ही दररोज लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आम्ही शनिवार व रविवार लॉकडाऊनचीही घोषणा केली आहे, जो शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहील. लॉकडाऊननंतर सर्वांनी घरातच राहण्याचे आवाहन करतो.
गेल्या 24 तासांत राज्यात 7014 नवीन कोरोना सापडले आहेत, तर 76 लोक मरण पावले आहेत. लुधियाना, मोहाली आणि जालंधर या तीन जिल्ह्यांतील सर्वात वाईट परिस्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लुधियानामध्ये कोरोनाचे 1389, मोहालीमध्ये 893 आणि जालंधरमध्ये 648 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या एक आठवड्यात कोरोना बाधितांचा दर 10 टक्क्यांहून अधिक झाला आहे. आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू म्हणाले की, 25 एप्रिलपर्यंत राज्यात कोविड-19 चे 48,154 रुग्ण सक्रिय आहेत.
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus)वेगाने वाढणार्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने राज्यभरात 14 दिवस पूर्ण लॉकडाऊन (Karnataka Lockdown) जाहीर केले आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) म्हणाले की, मंगळवारी रात्री 9 वाजेपासून पुढील 14 दिवस राज्यात कर्फ्यू लागू होईल.
कर्फ्यू दरम्यान, आवश्यक सेवांच्या पुरवठ्यासाठी दररोज सकाळी 6 ते 10 या दरम्यान हालचालींना परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर रात्री दहा वाजता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक परिवहन सेवा कर्फ्यू दरम्यान पूर्णपणे बंद ठेवली जाईल. केवळ मॅन्युफॅक्चरिंग युनिट (गारमेंट्स वगळता), बांधकाम आणि शेतीशी संबंधित लोकांनाच काम करण्यास अनुमती आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक सरकारनेही दारूची डिलिव्हरी (लिकूर होम डिलिव्हरी) करण्यास परवानगी दिली आहे.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती महाराष्ट्र आणि दिल्लीपेक्षाही वाईट आहे. सर्व प्रयत्नांनंतरही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच, लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आम्ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना विनामूल्य लस देण्याची घोषणा केली आहे. लोक त्यांच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना लस विनामूल्य मिळू शकेल.