Corona चा लोकांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर असा होतोय परिणाम

कोरोनाचे गंभीर लक्षणं दिसत नसली तरी असा होतोय परिणाम

Updated: Apr 8, 2021, 08:01 PM IST
Corona चा लोकांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर असा होतोय परिणाम title=

मुंबई : 8 महिने सोम्य लक्षणं असलेल्या 10 पैकी एका व्यक्तीमध्ये नंतर गंभीर लक्षणं दिसू लागली. कोरोनाचा परिणाम लोकांच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावर होतोय. अभ्यासानुसार असे आढळले आहे की दीर्घ-काळातील लक्षणांमध्ये थकवा, गंध जाणे, चव जाणे अशा गोष्टी दिसून येतात. काही लोकांमध्ये थकवा आणि श्वास घेण्याची समस्या देखील होती.

अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांच्यामध्ये कोरोना आहे त्यांच्यापैकी जवळजवळ 26 टक्के लोकांमध्ये मध्यम आणि दीर्घकालीन गंभीर लक्षणे होती, जी 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकली. सर्वात सामान्य दीर्घकालीन लक्षणे म्हणजे वास आणि चव, थकवा आणि श्वसन समस्या होती.

कोरोनामुळे लोकांची जीवनशैली खूप बदलली आहे. लोकं विनाकारण घराबाहेर पडत नाहीयेत. घरी दीर्घकाळ विश्रांती घेतल्यामुळे किंवा बराच काळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे हाडांचे अनेक रोगांना आमंत्रण दिलं जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. पाठदुखी, मान आणि खांद्यांना सूज यासारख्या स्नायूंच्या (स्नायू) समस्या वाढत आहेत. 

शरीराच्या हाडांमध्ये वेदना, कडकपणा आणि सूज येणे अशा समस्या ही लोकांमध्ये दिसून आल्या आहेत. 20 ते 40 वयोगटातील तरूण आणि किशोरवयीन मुले यांच्याच ही समस्या सर्वाधिक पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाना विशेष काळजी घेतली पाहिजे.

वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना पाठिचा त्रास देखील सुरु झाल्याचं पुढे आलं आहे. एकाच ठिकाणी तासोनतास बसून राहिल्याने त्रास वाढत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून राहणे टाळले पाहिजे. व्यायाम करणं अशा परिस्थितीत महत्त्वाचं आहे. सोबतच योग्य आहार ही घेतला पाहिजे. कारण शरिराची जास्त हालचाल होत नसल्याने शरिरात चरबी वाढण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे स्थुलपणा येऊ शकतो.

संबंधित बातमी : Corona च्या दुसऱ्या लाटेत समोर आली कोरोनाची नवी लक्षणं