535 कोटींची रोख रक्कम घेऊन निघालेला RBI चा कंटनेर रस्त्यातच पडला बंद; पोलिसांची एकच धावपळ, पण अखेर...

RBI Cash: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) रोख रक्कम घेऊन निघालेला ट्रक रस्त्यातच बंद पडला होते. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये 535 कोटींची रोख रक्कम होती. चेन्नईमधून (Chennai) हे ट्रक निघाले होते. अखेर हा ट्रक पुन्हा परत पाठवण्यात आला.   

शिवराज यादव | Updated: May 18, 2023, 02:30 PM IST
535 कोटींची रोख रक्कम घेऊन निघालेला RBI चा कंटनेर रस्त्यातच पडला बंद; पोलिसांची एकच धावपळ, पण अखेर... title=

RBI Cash: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दोन ट्रक निघाले होते. या ट्रकमध्ये एकूण 1070 कोटी रुपये होते. इतकी मोठी रक्कम असल्याने पोलिसांचाही फौजफाटा तैनात होता. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानक एक ट्रक रस्त्यात बंद पडला आणि सर्वांचीच धावपळ सुरु झाली. इतकी मोठी रक्कम असणारा ट्रक रस्त्यावरच अडकल्याने पोलीसही सतर्क झाले. यानंतर संपूर्ण रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटाच तैनात करण्यात आला. पण शेवटी बिघाड दुरुस्त न झाल्याने ट्रक पुन्हा रिझर्व्ह बँकेता पाठवण्यात आला. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. 

चेन्नईमधील विल्लूपुरम येथील रिझर्व्ह बँकेतून दोन्ही ट्रक निघाले होते. प्रत्येक ट्रकमध्ये 535 कोटींची रोख रक्कम होती. पण रस्त्यावरुन जात असतानाच एका ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर तब्बल 17 पोलीस रस्त्यावर या ट्रकच्या संरक्षणासाठी उपस्थित होते. 

535 कोटींची रोख रक्कम घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात बंद पडला असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर सुरक्षेसाठी पोलिसांची आणखी कुमक मागवण्यात आली. चेन्नई येथील आरबीआय कार्यालयातून जिल्ह्यातील बँकांमध्ये चलन पोहोचवण्यासाठी दोन्ही लॉरी विल्लुपुरमकडे निघाल्या होत्या. 

एक ट्रक बंद पडल्यानंतर  सुरक्षेच्या कारणास्तव तो चेन्नईतील तांबरम येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिद्धामध्ये हलवण्यात आलं. तांबरमचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचून तपासलं असता ट्रक बंद पडला होता. यानंतर ट्रक इन्स्टिट्यूट ऑफ सिद्धामध्ये हलवण्यात आला आणि गेट बंद करण्यात आला. इन्स्टिट्यूटमध्ये यावेळी प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. 

यानंतर ट्रक दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला बोलावण्यात आलं. पण ट्रक दुरुस्त होऊ शकला नाही. यामुळे तो पुन्हा चेन्नईतील रिझर्व्ह बँकेत पाठवण्यात आला. 

भारतात एकूण चार ठिकाणी नोटा छापल्या जातात. मध्य प्रदेशातील देवास, महाराष्ट्रातील नाशिक, पश्चिम बंगालमधील सालबोनी आणि कर्नाटकमधील म्हैसूर येथे नोट प्रेस आहे. देवास येथे एका वर्षात 265 कोटी नोटा छापल्या जातात. या नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईदेखील इथेच तयार केली जाते. 20, 50, 100 आणि 500 च्या नोटा या प्रेसमध्ये छापल्या जातात. नाशिकमध्ये 1991 पासून ही प्रेस आहे. येथे 1, 2, 5, 10, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा यथे छापल्या जातात. 

एका अहवालानुसार भारतात दरवर्षी 2000 कोटी नोटा छापल्या जातात. यामधील 40 टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यात येते. नोटेसाठी लागणारा कागद जर्मनी, ब्रिटन आणि जपानमधून आयात होतो. दरम्यान किती नोटांची छपाई केली पाहिजे याचा निर्णय आरबीआय घेतं, तर नाण्यांचा अधिकार सरकारकडे आहे.