गुजरातपासून काँग्रेस वाढायला सुरूवात झालीय-राजीव सातव

गुजरात निवडणूकचा निकाल म्हणजे भाजपचे नैतिक पराभव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 18, 2017, 02:01 PM IST
गुजरातपासून काँग्रेस वाढायला सुरूवात झालीय-राजीव सातव title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : गुजरात निवडणूकचा निकाल म्हणजे भाजपचे नैतिक पराभव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

भाजपच्या गडाला आम्ही भेदण्याचे काम- राजीव सातव

गुजरातचे प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी म्हटलं आहे, हा भाजपचा नैतिक पराभव आहे, भाजपने १५० जागांवर विजयाचा दावा केला होता, परंतु दीडशे जागा आल्या का ? गुजरात मॉडेल कुठे आहे ? विकासाचे गुजरात मॉडेल कुठेच नव्हते, भाजपचा दावा फोल झाला आहे.

भाजपच्या गडाला भेदण्याचे काम-सातव

भाजपच्या गडाला आम्ही भेदण्याचे काम केलं, आमचा वोट शेअर वाढला आहे. मग हा पराभव कोणाचा ? पंतप्रधानांनी भावनिक आवाहन केलं, खोटं बोलून मार्केटिंग केलं

४३ आमदारांपासून सुरूवात-सातव

यूपीच्या मुख्यमंत्री यांना गुजरातमध्ये प्रचारासाठी यावं लागलं, पंतप्रधान, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातचे तरीही जागा कमी झाल्या, अहमद पटेल यांच्या निवडणुकीत आम्हाला ४३ आमदारांनी साथ दिली, म्हणजे आम्ही आमच्या ४३ आमदारांपासून सुरूवात केली. 

काँग्रेस पुन्हा वाढायला सुरवात-सातव

ती आमची खरी ताकद होती, त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकल्या आहेत, आम्ही चांगला संघर्ष केला , गुजरातनं आम्हाला राहुल गांधी यांचे नेतृत्व दिलं, काँग्रेस पुन्हा वाढायला सुरवात झालीय, गुजरातमध्ये  काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत, वोट शेअर प्रमाणही वाढले आहे.