नवी दिल्ली: इंग्रजी भाषेचे पक्के जाणकार आणि त्या भाषेवर मजबूत पकड असलेले कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी निशब्द केले आहे. स्वत: थरूर यांनीही ही बाब मान्य करत बरखाचे कौतूक केले आहे.
देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शशी थरूर हे तसे ख्यातनाम व्यक्तीमत्व. त्यातही ते लेखक, विविध विषयांचे जाणकार असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप अनेकांवर पडते. महत्त्वाचे म्हणजे ते इंग्रजीचे पक्के जाणकार आणि तितकेच फर्डे वक्ते. त्यामुळे त्यांची इंग्रजी समजून घेण्यासाठी अनेकांना शब्दकोषच उघडावा लागतो. इतकेच नव्हे तर, इग्रजीतील भलेभलेही थरूर यांचे इंग्रजी पाहून पेचात पडतात. यासंदर्भात त्यांची अनेक ट्विट अपण पाहू शकता. त्यामुळे बजफीड डॉट कॉम नावाच्या एका वेबसाईटने थरूर यांच्या इंग्रजी ज्ञानावर वाचकांची एक स्पर्धाच घेतली.
बजफीडने घेतलेली स्पर्धा अशी होती की, शशी थरूर यांनी केलेली जवळपास १२ ट्विट्स निवडण्यात आली. त्यात थरूर यांनी वापरलेल्या काही शब्दांना निवडण्यात आले आणि वाक्यातील इतर शब्द ब्लर करण्यात आले. या शब्दांचे अर्थ लोकांना विचारण्यात आले. अनेक लोकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. पण, अनेकांना या स्पर्धेतील बऱ्याचशा शब्दांचे अर्थ सांगता आले नाहीत.
Ha ha ! I got 10 out of 12 on the @ShashiTharoor quiz! How do you measure up? https://t.co/jU4zXPJu2P
— barkha dutt (@BDUTT) January 20, 2018
For once @bdutt leaves me utterly speechless. https://t.co/DHcsY61Ifm
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 20, 2018
दरम्यान, ज्येष्ट पत्रकार बरखा दत्त यांनी ही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बरखा यांनी एकूण १२ पैकी १० शब्दांचे योग्य अर्थ सांगितले. यानंतर बरखा यांनी ट्विट करून 'शशी थरूर यांच्या शब्दस्पर्धेतील १२ पैकी १० गूण मिळवले', असे ट्विट केले. दरम्यान, बरका यांचे कौतूक करत थरूर यांनीही प्रतिसाद देत ट्विट केले. या ट्विटमध्ये थरूर यांनी म्हटले, 'काही क्षणांसाठी बरखा दत्त यांनी मला पूर्णपणे निशब्द केले'.