Sachin Pilot : 'आम्ही कर्नाटक जिंकतोय कारण...', सचिन पायलट यांचा निकालापूर्वी दावा

Sachin Pilot on Karnataka Election Result : कर्नाटकात काय निकाल लागणार याची मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागले आहे. राजस्थानमध्ये आपल्याच सरकारच्या विरोधात टीका करणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज कर्नाटकात येणाऱ्या निवडणूक निकालांबाबत मोठा दावा केला आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2023, 07:18 AM IST
Sachin Pilot : 'आम्ही कर्नाटक जिंकतोय कारण...', सचिन पायलट यांचा निकालापूर्वी दावा  title=

Sachin Pilot on Karnataka Election Result : कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस, जेडीएस यांच्यात चुसर आहे. कर्नाटकात मतदान झाल्यानंतर आज निवडणूक निकाल आहे. मतमोजणी सुरु होण्यापूर्वी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दावा केला आहे की, कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकेल. कारण आम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे., 'कर्नाटकमध्ये आम्ही जिंकत आहोत ,कारण आम्ही बसवराज बोम्मई यांच्याविरोधात सरकारच्या 40 टक्के कमिशनचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला. त्यामुळे आम्हाला पूर्ण बहुमत मिळत आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे आपल्याच राज्यात आपल्याच सरकारमुळे दुखावलेले पायलट यांनी कर्नाटकात भ्रष्टाचाराविरोधात कारवाईच्या नावाखाली मोठा विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र, राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारवर कारवाई न केल्याने त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पायलट असेही म्हणाले की, आम्ही राजस्थानमध्येही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला, मात्र साडेचार वर्षांत कोणतीही कारवाई झाली नाही, मग लोकांनी आमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असे सांगत काँग्रेसला धोक्याचा इशारा दिला आहे.

'मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही'

सचिन पायलट यांनी आपला विरोध हा कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही. मी कोणाच्याही विरोधात नाही. माझा हा प्रवास भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही सूडभावना नाही. संपूर्ण 'भ्रष्टाचार प्रणाली' (व्यवस्था) बदलणे आवश्यक आहे. माझा संघर्ष जनतेसाठी आहे. मात्र जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याची किंमत मोजावी लागते, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे पायलट म्हणाले.