Rahul Gandhi On Arvind Kejriwal Arrest : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गुरुवारी अटकेची कारवाई करण्यात आली. ईडीकडून (प्रवर्तन निदेशनालय) ही कारवाई करण्यात आली. ज्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. देशाच्या राजकारणातील गेल्या काही वर्षांपासूनची भाजपची भूमिका आणि एकंदर निर्माण केलेली परिस्थइती पाहता विरोधी बाकावर बसणाऱ्या अनेक नेत्यांनी भाजपवर घणाघात केला. काहींनी तर, देशातून भाजप सरकार हटवण्याचीही मागणी केली. काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा यात मागे राहिले नाहीत.
INDIA आघाडीमध्ये सहभागी झालेल्या आणि काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचं वृत्त कळताच X च्या माध्यमातून बोचऱ्या शब्दांत भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत राहुल गांधी म्हणाले, 'भयभीत हुकूमशाहा, एक मृतावस्थेतील लोकशाही बनवू पाहतोय. माध्यमांसह इतर सर्व संस्थांवर ताबा घेणं, पक्षांमध्ये दुफळी माजवणं, कंपन्यांकडून हफ्ता वसूल करणं, मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवणं हे सारंकाही या असुरी शक्तीसाठी काय कमी होतं, की आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक होणं ही बाबही अतिसामान्य झाली आहे.... INDIA याचं सडेतोड उत्तर दिल्यावाचून राहणार नाही.'
डरा हुआ तानाशाह, एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है।
मीडिया समेत सभी संस्थाओं पर कब्ज़ा, पार्टियों को तोड़ना, कंपनियों से हफ्ता वसूली, मुख्य विपक्षी दल का अकाउंट फ्रीज़ करना भी ‘असुरी शक्ति’ के लिए कम था, तो अब चुने हुए मुख्यमंत्रियों की गिरफ्तारी भी आम बात हो गई है।
INDIA इसका…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 21, 2024