नवी दिल्ली : राज्यसभेत आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.
काँग्रेस नेते आझाद यांनी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांना केवळ नावापुरत्या असल्याचं सांगितलं. मोदी सरकारनं काँग्रेस पक्षानं आपल्या कार्यकाळात सुरू केलेल्या योजना केवळ नाव बदलून आपल्या नावावर केल्याचं त्यांनी संसदेत म्हटलं.
Names of all the schemes launched under UPA governance after 1985 have been changed. That's why I say, that the government is not a 'game changer' but a 'name changer': Gulam Nabi Azad in Rajya Sabha pic.twitter.com/AsazRvy5Vt
— ANI (@ANI) February 5, 2018
आज पहिल्यांदाच संसदेत भाषण करणाऱ्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल बोलताना या योजना भाजपनं सुरू केल्याचं म्हटलं होतं.
शहा यांच्या भाषणानंतर गुलाब नबी आझाद यांनी '१९८५ नंतर काँग्रेस सरकारनं सुरु केलेल्या अनेक योजनांचं केवळ नाव बदललंय. त्यामुळे मोदी सरकार गेम चेंजर नाही तर केवळ नेम चेंजर आहे' असं म्हणत घणाघाती टीका केली.