कोच्ची : काँग्रेस पक्ष हा सध्या संकटात आहे. हे संकट पराभवाचं नाही तर अस्तित्वाचं आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. १९९६ ते २००४ आणि १९७७मध्ये काँग्रेसनं निवडणुकीच्या संकटाचा सामना केला होता. पण आत्ताचं संकट हे अस्तित्वाचं आहे, असं जयराम रमेश म्हणालेत.
मोदी आणि शाह हे वेगळ्या पद्धतीनं विचार करतात, अशी प्रतिक्रिया रमेश यांनी दिली आहे. मोदींच्या विरोधात असलेल्या लाटेमुळे राज्यांमध्ये विजय होईल असा काँग्रेसचा विचार चुकीचा होता, याची कबुलीही जयराम रमेश यांनी दिली आहे. भारत बदलला आहे हे काँग्रेसला मान्य करावं लागेल. आता जुना फॉर्म्यूला काम करत नाही. जुने मंत्र आणि नारेही चालत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला आता बदलावं लागेल, असं स्पष्ट मत जयराम रमेश यांनी मांडलं आहे.