कोरोनाच्या लसीबाबत अफवांमुळे लोकांमध्ये संभ्रम

कोरोना लस येण्याआधीच अफवा...

Updated: Dec 21, 2020, 08:55 PM IST
कोरोनाच्या लसीबाबत अफवांमुळे लोकांमध्ये संभ्रम title=

अमर काणे, नागपूर : कोरोनाची लस बाजारात येऊ घातली असतानाच नवनव्या अफवा उठवल्या जाऊ लागल्य़ात. कोरोनाच्या लसीत डुकरांचं मांस असल्याची अफवा उठवण्यात आली आहे. त्यामुळं लस घ्यावी की नाही या संभ्रमात अनेक देश आहेत.

कोरोना लस जागतिक बाजारात येण्यास सुरुवात झाली असतानाच अफवांचा बाजार गरम झालाय. कोरोना लस तयार करण्यासाठी डुकराचं मांस वापरलं जात असल्याची अफवा अरब देशांमध्ये उठवण्यात आलीय. त्यामुळं अरब देशातील नागरिक आणि इंडोनेशियासारख्या मुस्लीमबहुल देशांत लस घ्यावी की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. फायझर, मॉडेर्ना, एस्ट्राजेनेका या जगातल्या आघाडीच्या लस उत्पादक कंपन्यांनी ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंय.

कोरोनाची ही लस घ्यावी की नाही याबाबत मुस्लीम धर्मगुरुंमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळं लसीकरणाबाबत कोणते आदेश द्यावेत हे ठरलेलं नाही. कोरोनाच्या लसीबाबत यापूर्वीही अनेक अफवा उठवल्या गेल्या. 

कोरोनाची लस घेतल्यास डीएनएच बदलतो. कोरोनाच्या लसीत माणसाचा ठावठिकाणा सांगणारी मायक्रोचीप आहे. ही मायक्रोचीप  कारस्थानामागं बिल गेट्स यांचा हात आहे. कोरोना लस घेतल्या गर्भपात होईल अशा वेगवेगळ्या अफवा उठवण्यात आल्या. लसीकरण झालं नाही तर त्याचे मोठे परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतील हे मात्र निश्चित आहे.