नवी दिल्ली : 2021 हे वर्ष आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली कमाई करून देणारे ठरले आहे. आतापर्यंत तब्बल 42 आयपीओ लॉंच झाले आहेत. यामाध्यमातून मार्केटमधून 65 हजार कोटी उभारण्यात आले आहेत. मागील 10 वर्षांचा विचार केल्यास 2017 मध्ये सर्वाधिक आयपीओ लॉंच झाले होते. या वर्षाच्या शेवटापर्यंत 2017 या सालचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो. प्रायमरी मार्केटमध्ये मिळणाऱ्या चांगल्या रिस्पॉंजमुळे कंपन्या बॅक टू बॅक आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नुकतेच काही कंपन्यांनी मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI)कडे कागदपत्र (DRHP)जमा केले आहे. अप्लाय करणाऱ्या कंपन्यांची रांग वाढतच आहे. जर तुम्ही आयपीओच्या माध्यमातून पैसे गुंतवू इच्छित असाल तर, आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे तयार ठेवा.
Electronics Mart India IPO
कंज्युमर ड्युरेबल रिटेल चैन इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडिया आपला 500 कोटींचा आयपीओ आणणार आहे. कंपनीने SEBIकडे कागदपत्र (DRHP)जमा केले आहेत. या फंडचा वापर करून कॅपिटल एक्सपेंडिचर आणि वर्किंग कॅपिटलची गरज पूर्ण करण्यात येणार आहे.
Hariom Pipe Industries IPO
हरीओम पाइप इंडस्ट्री स्टील पाइप बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीने SEBIकडे कागदपत्र जमा केले आहेत. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीचे 120 कोटींची उभारणी करण्याचे लक्ष आहे.
Data Patterns IPO
डिफेंस सेक्टरमधील कंपनी डाटा पॅटर्न्सने देखील आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. कंपनीच्या इश्यूची साइज 600 ते 700 कोटी रुपये इतकी असू शकते.
MapmyIndia IPO
डिजिटल मॅप बनवणारी कंपनी MapmyIndia ने आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्र दाखल केले आहेत. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचे 1200 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे.
Puranik Builders IP
पुराणीक बिल्डर्स ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे. आयपीओमध्ये 510 कोटी रुपयांचे शेअर जारी करण्यात येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्र जमा केले आहेत.