LIC HFL | 2 कोटींपर्यंत गृहकर्जाच्या व्याज दरात मोठी कपात; स्वस्तात घराचे स्वप्न होणार पूर्ण

 तुम्हाला नवीन घर खरेदी करायचे असेल तर स्वस्तात गृहकर्ज मिळू शकते.

Updated: Sep 24, 2021, 07:40 AM IST
LIC HFL | 2 कोटींपर्यंत गृहकर्जाच्या व्याज दरात मोठी कपात; स्वस्तात घराचे स्वप्न होणार पूर्ण title=

नवी दिल्ली :  तुम्हाला नवीन घर खरेदी करायचे असेल तर स्वस्तात गृहकर्ज मिळू शकते. एलआयसी हाउसिंग फायनान्सने गुरूवारी स्पष्ट केले की, 2 कोटी पर्यंतच्या गृह कर्जासाठी (home loan) कमीत कमी 6.66 टक्के व्याज द्यावे लागेल. पीटीआयच्या वृत्तानुसार एलआयसी एचएफएलने याआधी जुलैमध्ये गृह कर्जाच्या 50 लाखापर्यंतच्या रक्कमेवर 6.66 टक्के व्याज दराची घोषणा केली होती.

वृत्तानुसार एलआयसी एचएलएल (LIC Housing Finance )ने म्हटले की, हा दर 700 किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोअर असलेले सर्वांसाठी उपलब्ध आहे. तसेच हा दर 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत स्विकृत कर्ज (Sanctoned loans)साठी असणार आहे.

एलआयसी एचएफएलमध्ये (LIC HFL) गृहकर्जासाठी अप्लाय करीत असाल तर प्रॉपर्टीच्या मूल्याच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. जर 30 ते 75 लाखापर्यंत कर्ज घेत असाल तर, प्रॉपर्टीच्या मूल्याच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकेल.