6 दिवसात दुसऱ्यांदा CNG महागला, जाणून घ्या आपल्या शहरातील किंमत

CNG Latest Rate: सीएनजीच्या ( CNG) दरात वाढ होतच आहे. आज सकाळपासून सरकारने सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ केली आहे. 

Updated: May 21, 2022, 12:36 PM IST
6 दिवसात दुसऱ्यांदा CNG महागला, जाणून घ्या आपल्या शहरातील किंमत title=

मुंबई : CNG Latest Rate: देशात महागाईचा आगडोंब सुरुच आहे. आता सरकारने पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. IGL ने दिल्ली-NCR आणि आसपासच्या भागात CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग केला आहे. ही वाढीव किंमत शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. या घोषणेमुळे नोएडा-ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये CNG 78.17 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 

आता दिल्लीत CNG 75.61 रुपये प्रति किलो  

केंद्र शासनाने अच्छे दिनचे स्वप्न भंग होताना पाहायला मिळत आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर वाढले नसेल तरी सीएनजीचे वाढले आहेत. नाशिकमध्ये तब्बल 3 रुपयांनी  प्रति किलोने  सीएनजीचे दर वाढले. काल सीएनजी  दर 83 रुपये होता. मध्यरात्रीपासून 86 रुपये इतका झाला आहे . सीएनजीच्या ( CNG) दरात वाढ होतच आहे. आज सकाळपासून सरकारने सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 83.94 रुपये प्रति किलो आणि दिल्लीमध्ये 75.61 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या 6 दिवसांत सीएनजीच्या दरात झालेली ही सलग दुसरी वाढ आहे. यापूर्वी 15 मे रोजी सीएनजीच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सीएनजी 77.20 वरुन 80 रुपयांवर पोहोचला आहे. 2 रुपये 80 पैसे सीएनजीमध्ये वाढ झाली आहे.

लोकांचे इंधनाचे पर्याय महाग  

सीएनजी हे वाहनांसाठी स्वस्त आणि सुरक्षित इंधन मानले जाते. त्यामुळे महाग असूनही लोक सीएनजी वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत.  मात्र, आता सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हा पर्यायही लोकांना महागात पडत आहे.

सर्वसामान्यांना परवडणे कठीण

 पेट्रोल आणि डिझेलबद्दल बोललो तर देशभरात त्यांच्या किंमती सतत 100 रुपयांच्या वर जात आहेत. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजेच एलपीजी गॅसच्या सिलिंडरनेही एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या समस्या वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे मालाची वाहतूक आणि लोकांची ये-जा करणेही महाग झाले असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.