अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे.
हे मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यांत ८९ जागांसाठी आज मतदान होणार आहे. या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार ९७७ उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद करतील.
CM Vijay Rupani casts his vote in Rajkot. He is contesting against Congress’ Indranil Rajyaguru from Rajkot-West seat #GujaratElection2017 pic.twitter.com/d38IIAPs0v
— ANI (@ANI) December 9, 2017
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय. पहिल्या टप्प्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रुपानी यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलं आहे. मतदानाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंदिरात पूजा अर्चा केली. यानंतर रुपानी यांनी जनतेला मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.
We are going to win 150+ seats under the leadership of PM Modi ji, we face no obstacles: Jitu Vaghani,BJP Gujarat Chief and candidate from Bhavnagar West #GujaratElection2017 pic.twitter.com/JrC3lKBQHn
— ANI (@ANI) December 9, 2017
मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, काँग्रेसचे शक्तिसिंग गोहिल, परेश धनानी या दोन्ही पक्षांमधल्या मोठ्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसलाही आजच निश्चित होणार आहे.
Visuals of locals after casting their vote in Surat's Majura. BJP MLA Harsh Sanghvi is contesting against Congress's Ashok Kothari. This seat was formed after the 2008 delimitation. #GujaratElection2017 pic.twitter.com/zWTV4fq7I6
— ANI (@ANI) December 9, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.