पंजाब निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत, EDकडून निकटवर्तीला अटक

Bhupinder Honey : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Updated: Feb 4, 2022, 09:28 AM IST
पंजाब निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत, EDकडून निकटवर्तीला अटक title=

चंदीगड :  Bhupinder Honey : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचा पुतण्या भूपिंदर हनी (Bhupinder Honey) याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (Enforcement Directorate arrested Bhupinder Honey)अटक केली आहे.

चौकशीनंतर हनीला अटक 

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने भूपिंदर हनी (Bhupinder Honey) यांना जालंधर येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी केल्यानंतर ईडीचे उत्तरांनी समाधान न झाल्याने हनी याला अटक करण्यात आली. त्याला आज (४ जानेवारी) मधुला मोहाली न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी मोठी कारवाई

पंजाबसाठी, काँग्रेस 6 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावांची चर्चा आहे. पंजाब काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चरणजित सिंग चन्नी यांचे नाव आघाडीवर आहे.

 ईडीला सापली 10 कोटींची रोकड

ईडीने काही दिवसांपूर्वी मोहाली आणि लुधियाना येथील भूपिंदर हनी आणि त्याच्या साथीदारांच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकले होते. यावेळी 10 कोटी रोकड, 12 लाखांचे रोलेक्स घड्याळ, 21 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. ईडीने हनीच्या मोहाली येथील घरातून 8 कोटी रुपये आणि त्याचा साथीदार संदीपच्या लुधियाना येथील घरातून 2 कोटी रुपये जप्त केले आहेत.

2018मधील प्रकरण

2018 मध्ये अवैध वाळू उत्खननाची नोंद झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या हवाई दौऱ्यात अवैध वाळू उत्खनन पकडल्यानंतर हे प्रकरण घडले. त्यानंतर पोलिसांनी रोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ईडीकडून हनीची वैद्यकीय तपासणी 

मिळालेल्या माहितीनुसार, भूपिंदर हनी याने अटकेनंतर बरे नसल्याची तक्रार केली. यानंतर, ईडी टीमने त्याला जालंधरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आढळले. हनीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले, त्यानंतर ईडी त्याला कार्यालयात घेऊन गेली.