जमशेदपुर : शिक्षकी (Teacher) पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षकाने कॉपीचा संशय घेत विद्यार्थीनीसोबत वाईट वर्तन केल्याची घटना घडली आहे. या घटनेने विद्यार्थीनीला जबर धक्का बसला असून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.
पीडित विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी शाळेत (school girl) गेली होती. परीक्षेला बसल्यावर विद्यार्थीनीसमोर कॉपी सापडल्याची घटना घडली.यावेळी एक्झामिनर म्हणून असलेल्या शिक्षकाने संतापत, कॉपीचा संशय घेत विद्यार्थीनीला कपडे उतरवायला लावले. या घटनेने तिला मोठा धक्का बसला आणि तिने घरी जाऊन मोठं पाऊल उचलंल.
संपुर्ण वर्गासमोर कपडे उतरवायला लावल्याने विद्यार्थीनीला (school girl) मोठा धक्का बसला. या घटनेनंतर पीडित विद्यार्थी (school girl) घरी पोहोचली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आली. शाळेतून येताना ती खूप शांत होती. आणि नंतर आपल्या खोलीत गेली. दहा मिनिटांनी अचानक खोलीतून ओरडण्याचा आवाज आला आणि धूर निघू लागला. कूटूंबियांनी दरवाजा तोडला असता तिने स्वत:आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. कुटूंबियांनी तिच्या शरीरावरील आग विझवत तिला नजीकच्या एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला टीएमएचमध्ये रेफर केले.दरम्यान डॉक्टरांनी (doctor) मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. तसेच सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
झारखंडच्या जमशेदपूरमधील एका शाळेत (school girl) ही घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय. तसेच या प्रकरणात आता कुटूंबियांनी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता शाळा प्रशासन शिक्षकावर कारवाई करते का हे पाहावे लागणार आहे.