Cleaning Tips : गंजलेल्या इस्त्रीमुळे कपड्यांवर डाग पडतात का ? हे cleaning hacks करतील मदत

Cleaning Tips : बऱ्याचदा आपण इस्त्री करायला जातो आणि ती कपड्यावर ठेवताच कपड्याला चिकटते किंवा डाग सोडते त्यामुळे कपडे तर खराब होतातच शिवाय इस्त्राईल कापड चिकटल्याने तीसुद्धा खराब होते.

Updated: Feb 21, 2023, 11:58 AM IST
Cleaning Tips : गंजलेल्या इस्त्रीमुळे कपड्यांवर डाग पडतात का ? हे cleaning hacks करतील मदत  title=

Rusty Iron Cleaning Tips :   इस्ञी प्रत्येकाच्या घरात असणारी वस्तू आणि तितकीच महत्वाची सुद्धा मात्र, आपल्यापैकी किती जण रोजच्या रोज इस्त्री वापरून झाल्यावर स्वच्छ करतो ? जोपर्यंत इस्ञीवर काही डाग पडत नाहीत किंवा इस्ञी खूप गरम होते आणि मग त्याला कापड चिकटवून खराब होत नाही. तोवर आपण इस्ञी स्वच्छ करायला घेत नाही.. आणि मग मात्र स्वच्छ होता होत नाही (Ceaning tips) आणि आपण हैराण होतो. पण आता या समस्येवर कायमचा उपाय तुम्ही करू शकता.काही घरगुती उपाय आहेत. ज्यामुळे तुम्ही इस्ञीवरील गंजलेला डाग (Cleaning hacks) काढून स्वच्छ, लखलखीत इस्ञी मिळवू शकता. यासाठी काय करायचंय चला तर मग पाहूया. (how to get rid of rusty iron)

पॅरासिटेमॉल 
ताप आल्यावर घेतली जाणारी पॅरासिटेमॉल (Paracetemol) ही खूप कामाची आहे . इस्त्रीवर कापड चिकटल्याने जर डाग पडला असेल, तर हा रामबाण उपाय तुम्ही नक्क्की करून पाहायलाच हवा . यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर इस्ञी आधी गरम करून घ्या त्यांनतर बंद करून त्यावर पॅरासिटेमॉल  कडेकडेने घासायला सुरवात करा मग स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या . हीच प्रोसेस दोन तीन वेळा पुन्हा करा आणि काही वेळातच तुम्हाला फरक दिसू लागेल. (how to get rid of rusty iron)

बेकिंग सोडा आणि पाणी
हा उपायसुद्धा खूप फायदेशीर आहे यासाठी एक चमचा पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा घेऊन पेस्ट बनवून घ्या आता या पेस्टला इस्ञीवर लावून ठेवा २-३ मिनिटांनंतर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या. या उपायाने इस्त्रीवरील हे डाग निघून जातील. 

चुना आणि मीठ 
इस्ञीवरील गंज(rust ) घालवण्यासाठी चुना आणि मिठाचा वापर तुम्ही करू शकता यासाठी एका भांड्यात मीठ आणि चुना समप्रमाणात घ्या त्याची एक चॅन पेस्ट बनवा या पेस्टला इस्त्रीवर लावून ठेवा आणि काही वेळांनंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या . तुम्ही सॅण्डपेपर चा सुद्धा वापर करू शकता. ((how to get rid of rusty iron))