मुंबई : ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस मोठा दिवस या नावानेही प्रसिद्ध आहे. अलिकडे ख्रिसमस जगभरातील सर्वच लोकांकडून साजरा केला जातो.
मुख्यता हा उत्सव ख्रिश्चन लोकांकाडून साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा आनंद म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण अनेकांना ख्रिसमस आणि सांताक्लॉज यांच्याबाबत फारशी माहिती नसते. जाणून घेऊया याच काही खास गोष्टी....
मोठा दिवस म्हणून साजरा केला जाणारा ख्रिसमस हा शब्द दोन शब्द क्राईस्ट्स आणि मास पासून तयार झाला आहे. ख्रिसमस हा शब्द मध्य काळातील इंग्रजी शब्द क्रिस्टेमसे आणि जुना इंग्रजी शब्द क्रिस्टेसमॅसेपासून तयार झाला आहे. सन १०३८ मध्ये या दोन शब्दांना एकत्र करून ख्रिसमस म्हटलं गेलं होतं.
ख्रिसमस हा ख्रिश्चनांचा सर्वात मोठा सण आहे. पहिला ख्रिसमस रोममध्ये ३३६ इ. मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर जगभरात २५ डिसेंबरला हा उत्सव साजरा होतो.
प्रभू येशू ख्रिस्त आणि सांताक्लॉज यांचा आपसात कोणताही संबंध नाहीये. सांताक्लॉजला आठवण्याची पद्धत ४थ्या शताब्दीपासून सुरू झाली होती आणि ते संत निकोलस होते. हे तुर्किस्तानच्या मीरा नावाच्या शहराचे बिशप होते.
येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. पण जपानमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जपानमध्ये ख्रिसमस उत्सव प्रेमाचं प्रतिक म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवसांमध्ये जपानी लोक इंटरनेटवर जोडीदार शोधताना दिसतात. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कुणीना कुणी जोडीदार मिळतात सुद्धा. म्हणजे ख्रिसमसकडे जपानमध्ये मित्र बनवण्याचा एक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं.