मुंबई : भारतासह जगभरात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भेटवस्तू, शुभेच्छा आणि सजवलेल्या ख्रिसमस ट्रीची रेलचेल हे या सणाचे मोठे वैशिष्ट्य. पण, जगभरातील सर्वच सणांना शुभेच्छा, भेटवस्तू वैगेरे दिल्या जातात. पण, केवळ ख्रिसमस या सणालाच ख्रिसमस ट्री सजवला जातो. तुम्हाला माहिती आहे का ख्रिसमस सजविण्याचे कारण? नसेल तर घ्या जाणून....
ख्रिसमस ट्री सजविण्याबाबत अनेक समज, गैरसमज आहेत. त्यापैकी काही पुढे देत आहोत.
असेही सांगितले जाते की, इग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री सजविण्याबाबत विशेष समज आहेत. वाढदिवस, एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू आदी गोष्टींसाठीही ख्रिसमस ट्री लावला जातो. या ट्रीच्या माध्यमातून ते प्रार्थना करतात की पृथ्वीवर नेहमी सुख समृद्धी लाभावी. काही प्राचीन कथांमध्येही उल्लेख आहे की, सुखसंमृद्धी प्राप्त होण्यासाठी ख्रिसमस ट्रीची बाग लावण्यात आली होती.
सांगितल्या जाणाऱ्या दंतकथेनसार, ख्रिसमस ट्रीला हवेने वर्ज्य केले तसेच, ईश्वराने त्या खाण्यास मनाई केली. तेव्हापासून या झाडाची वाढ खुंटली. पाने आखडली गेली आणि ती छोटी बनली. सांगितले जाते की, या झाडाची वाढ तेव्हापर्यंत नाही झाली. जोपर्यंत पृथ्वीतलावर येशूचा जन्म नाही झाला. पृथ्वीवर येशूचा जन्म झाला आणि या झाडाची वाढ पुन्हा होऊ लागली.
ख्रिसमस ट्रीबाबत असेही सांगितले जाते की, एकदा एक व्यक्ती आपल्या घरी या वृक्षाचे रोपटे घेऊन आला. त्याने हे रोपटे आपल्या घरी लावले. मात्र, अल्पावधीतच एका कोळ्याने त्यावर जाळे विनले. मात्र, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा हे जाळे सोन्याच्या तारेच्या रूपात बदलले. तेव्हापासून ख्रिसमस ट्री सजविण्यात येऊ लागला.
अर्थात ख्रिसमस ट्री का सजवतात याबाबत कोणीच ठोस माहिती सांगत नाही. मात्र, दंतकथा, आणि इतिहास, पुरानातील गोष्टींचा आधार घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यातीलच काही गोष्टी आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवल्या. या कथा किंवा मुद्द्यांबाबत झी मीडिया पुष्टी करत नाही.