नवी दिल्ली : भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ऍपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. यामध्ये Tik-Tok, Helo, UC Browser आणि Zoom अशा ऍप्सचा समावेश आहे.
शिवाय चीनमधील शॉपिंग ऍप Shien आणि Xiaomi देखील सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. Tik-Tok, Helo, UC Browser या ऍप्सचा युझर्स आपल्या मनोरंजनासाठी वापर करतात. परंतु हे सर्व ऍप्स तुमच्या फोनची लोकेशन आणि महत्त्वाची माहिती हस्तगत करते. शिवाय ऍप्सच्या माध्यमातून हस्तगत केलेली सर्व माहिती चिनी कंपन्यांनी चीन सरकारला पुरवणे बंधनकारक असते.
या माहितीच्या सहाय्याने चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी सैन्य देशावर हल्ला करण्याची रणनीती आखू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या ऍप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे
सर्वाधिक वापरात येणाऱ्या चिनी ऍप्सची यादी
टिक-टॉक (Tik – Tok)
हेलो (Helo)
यूसी ब्राउजर (UC Browser)
यूसी न्यूज (UC News)
शेयर इट (Sharit)
लाइकी (Likee)
360 सिक्योरिटी (360 Security)
न्यूज डॉग (NewsDog)
शिन (SHEIN)
व्हिगो व्हिडियो (Vigo Video)
वी चैट (WeChat)
वीबो (Weibo)
वीबो लाइव (Vibo live)
क्लब फॅक्टरी (Club Factory)