मुंबई : देशातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 12 हजार 881 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 334 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, आता देशात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 66 हजार 946 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 12 हजार 237 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत 7 हजार 390 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 94 हजार 325 वर पोहोचली आहे. देशात सध्या 1 लाख 60 हजार 384 रुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण रुग्ण 1 लाख 16 हजारांच्या वर आहेत, तर दिल्लीत 47 हजारांहून अधिक कोरोना संक्रमित आहेत.
दिल्लीत बुधवारी कोरोनाचे 2414 नवीन रुग्ण वाढले. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 47,102 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे दिल्लीत 67 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय राजधानीत कोरोनामुळे एकूण 1904 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3307 नवीन रुग्ण वाढले आहेत तर 114 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण मृतांची संख्या 5651 वर पोहोचली असून एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 16 हजार 752 झाली आहे. तर 51 हजार 921 लोकांवर उपचार सुरु असून 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे एकूण रुग्णांची संख्या वाढून 61 हजार 587 झाली आहे, त्यामध्ये 3 हजार 244 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 1359 नवीन रुग्ण आढळले असून 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 997 आहे.