Swiggy वरुन मागवेल्या जेवणात आढळले चिकनचे तुकडे, अभिनेत्याचा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

स्विगीवरून ऑर्डर केलेल्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे आल्याचा दावा अभिनेत्याने केले आहे

Updated: Aug 18, 2022, 11:09 PM IST
Swiggy वरुन मागवेल्या जेवणात आढळले चिकनचे तुकडे, अभिनेत्याचा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप  title=

स्विगी (Swiggy), झोमॅटो सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांचा व्यवसाय सध्याच्या काळात झपाट्याने वाढत आहेत. कारण आजच्या डिजिटल जगात आणि व्यस्त जीवनात, घरबसल्या जेवण ऑर्डर करण्याची सुविधा लोकप्रिय झाली आहे. या कंपन्या अनेक वेगवेगळ्या ढाब्यांशी किंवा हॉटेलसोबत व्यवहार करतात. त्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्या विविध हॉटेलमधून ग्राहकांना जेवण पुरवत असतात.

त्यामुळे कधी-कधी जेवणात गडबड होत असल्याच्या तक्रारीही समोर येतात. यामुळेच फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी अनेकदा वादात सापडल्याचे पाहायला मिळालं आहे. आता एका तमिळ गीतकाराने त्याच्या ट्विटर हँडलवर काही फोटो शेअर केली आहेत आणि दावा केला आहे की स्विगीवरून ऑर्डर केलेल्या शाकाहारी जेवणात चिकनचे (chicken) तुकडे आले आहेत.

तमिळ गीतकार को शेषा (Ko Sesha) यांनी आरोप केला आहे की त्यांनी स्विगीमधून शाकाहारी (veg) पदार्थ ऑर्डर केले होते, परंतु त्यात चिकनचे तुकडे आढळले. को शेषाने ट्विट करून स्विगीवर हा आरोप केला आहे. तसेच धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप केला आहे.

शेषाने ट्विट करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. "कोबी मंचुरियन विथ कॉर्न फ्राइड राईस'मध्ये चिकनचे तुकडे आले आहेत. मी स्विगीच्या माध्यमातून द बाउल कंपनीकडून जेवण मागवले होते. आता स्विगीचे कस्टमर केअर त्याऐवजी 70 रुपये देणार आहे. माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत," असे शेषाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, को शेषाच्या ट्विटला 1000 हून अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने ते चिकन आहे असे वाटत नाही. हे चिकन आहे हे तुम्हाला कसे कळेल? तुम्ही यापूर्वी चाचणी केली आहे का? असा सवाल केला आहे. त्यावर उत्तर देताना माझ्या दोन मांसाहारी मित्रांनी चिकनचे तुकडे खाल्ले आणि सांगितले. तुम्ही येऊ शकता, चव घेऊ शकता, असे प्रत्युत्तर दिलं आहे.

तर आणखी एका यूजरने तुम्ही मांसाहारी रेस्टॉरंटमधून ऑर्डर दिल्यास आणखी काय अपेक्षित आहे. काय तर्क आहे? रेस्टॉरंटच्या समोर व्हेज आणि नॉन व्हेज असे लिहिले आहे ना? असा सवाल केला आहे.