Chhattishgarh Crime : छत्तीसगढच्या रायपूरमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादात महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 24 तासांपूर्वीच एका महिलेची घरगुती कारणावरुन हत्या झालेली असताना पुन्हा एक हत्या झाल्याने रायपूरमध्ये खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
रायपूरमध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येमागचं कारण म्हणजे पत्नीने कपडे धुण्यास नकार दिला हे होतं. हे संपूर्ण प्रकरण रायपूरच्या खरोरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. शांतीनगरमध्ये राहणाऱ्या यज्ञबाला दिवांगण याने पत्नी तिजन बाई या महिलेचा कात्रीने वार करून खून केला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते.
आरोपी यज्ञबालाने कपडे धुण्यास सांगितले असता पत्नीने उत्तर त्याला नकार दिला.मी येथे कपडे धुण्यासाठी आलेले नाही, असे उत्तर पत्नीने दिले. हे ऐकून नवऱ्याचा संयम सुटला आणि त्याने हा पत्नीची हत्यी केली. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सातत्याने वाद होत असून दररोज छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात मारामारी होत होती. हत्येच्या दिवशीही पती यज्ञबाला पत्नीला कपडे धुण्यासाठी जोरजोरात ओरडून सांगत होता. मात्र पत्नीने नकार दिल्याने यज्ञबालाने तिची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञबाल दिवांगण हा ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करतो. तर तीजन घरी भरतकाम आणि विणकाम करायची. तीजन बाई ही आरोपी दिवांगणची दुसरी पत्नी होती. त्याची पहिली पत्नी सरस्वतीचे 2019 मध्ये यकृताच्या आजाराने निधन झाले होते. त्यानंतर, 2020 मध्ये तीजनशी लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र पती-पत्नीमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असत.
गुरुवारी सकाळी यज्ञबालने पत्नीला माझे कपडे धुवून टाक असे सांगितले. त्यावर पत्नीने मी इथे कपडे धुवायला आलेली नाही, असे म्हटलं. या गोष्टीचा यज्ञबालला प्रचंड राग आला. त्यानंतर त्याने रागाने घरातील कात्रीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आरोपी यज्ञबालने कात्री पत्नीच्या गळ्यात खुपसली. यज्ञबालने कात्रीने पत्नीच्या मानेवर एवढ्या जोरात वार केले की ती घशातच अडकली. महिलेचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्यांनी घराकडे धाव घेतली.
शेजारच्यांनी येऊन पाहिलं तर पत्नी तीजन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती. शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत पतीने आपला गुन्हा कबूल केला आहे.