मुंबई : भाजी (vegetable) ही सर्वसामान्यपणे खाण्यातील सामान्य डिश आहे. मात्र, ही भाजी महाग झाली तर गृहिणींचे बजेट कोलमडते. भाजी हा आपल्या घरातील सर्व पदार्थांबरोबर घेण्याचा पदार्थ आहे. जर एखाद्याने तुम्हाला सर्वात महाग भाजी (Most Expensive Vegetable) विचारले तर तुम्ही प्रति किलो 50-60 किंवा 90-100 रुपये सांगाल. मात्र, ही देशातील सर्वात महाग भाजी आहे, याची किंमत जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. (India's most expensive Sarai Boda vegetable)
छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यात ही महागडी भाजी मिळत आहे. देशातील महागडी भाजी 2000 रुपये किलोला विकली जात आहे, असे कोणी सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. छत्तीसगडमध्ये पिकणारी देशातील या सर्वात महाग भाजीचे नाव सराई बोडा (Sarai Boda) आहे. ही भाजी धमतरी जंगलात (Dhamtari Forests) पिकविली जाते. आसपासच्या खेड्यांमध्ये ही भाजी 300 रुपये किलोला विकली जाते. छत्तीसगडमधील शहरांमध्ये 600 रुपये किलोला आणि देशातील महानगरांमध्ये 2000 रुपये किलोपर्यंत विकली जाते.
बोडा खरं तर बुरशीचे नाव आहे. शास्त्रज्ञांनी त्याचे वनस्पती नाव शोरिया रोबस्टा ठेवले आहे. या भाजीला छत्तीसगडचे काळे सोने देखील म्हणतात. छत्तीसगडचा धमतरी जिल्हा सल वनांसाठी ओळखला जातो. या जंगलात सराई आढळते. स्थानिक आदिवासी त्याला बोडा म्हणतात. त्यामुळे त्याला सराई बोडा हे नाव पडले.
सालच्या जंगलात, पहिल्या पावसापासून माती ओली झाल्यावर सालच्या झाडाची मुळे विशिष्ट प्रकारचे द्रव सोडतात. यानंतर, या बुरशीचे साल जमिनीवर पडलेल्या कोरड्या पानांखाली तयार होते, ज्याला बोडा म्हणतात. आदिवासींनी हा सराई बोडा लाकडाच्या साहाय्याने जमिनीतून सुखरूप बाहेर काढतात. सराई बोडाची चव ही त्याच्या प्रचंड मागणीसाठी सर्वात मोठे कारण आहे. वर्षाकातील काही ठराविक दिवसात ही भाजी कठिण परिस्थित मिळते. अशा परिस्थितीत जेव्हा बोडाची मागणी वाढते, तेव्हा त्याची किंमत देखील वाढते.
बोडामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. ही भाजी कुपोषण, हृदय आणि पोटाच्या आजारांमध्ये फायदेशीर ठरते. सराई बोडा शतकानुशतके स्थानिक आदिवासींसाठी सराई बोडा (Sarai Boda) एक भाग जेवणातील महत्वाचा हिस्सा आहे. पहिल्या पावसानंतर ते बोडा गोळा करण्यासाठी जंगलात जातात. यानंतर ते स्वत:साठी काही ठेवतात आणि उरलेला विक्रीसाठी नेतात. यामुळे त्यांना उपजीविकेसाठी चार पैसे मिळातात आणि त्यामुळे अन्न-धान्य घेता येते. याभाजीतून भरपूर पैसेही मिळतात.