छत्तीसगड : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष राष्ट्राचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. निर्यात वस्तूंवरील कर देखील वाढवण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसीमधून काढून टाकण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पाक संघ वर्ल्डकपमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हॅकर्सकडून होणारे सायबर हल्ले वेगाने वाढले आहेत. पाकिस्तानी हॅकर्सनी 100 हून अधिक वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. छत्तीसगड भाजपाच्या वेबसाइटला देखील याचा फटका बसला आहे.
पाकिस्तानी हॅकर्सकडून झालेल्या सायबर हल्ल्यात 100 हून अधिक वेबसाईट हॅक झाल्या असून त्यात आमची वेबसाईटदेखील असल्याचे भाजपा स्टेट आयटी सेलचे प्रमुख हेड डी मस्खे यांनी सांगितले. आम्ही यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तान आम्हाला थेट विरोध करु शकत नाही म्हणून ते असे प्रकार घडवून आणत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Chhattisgarh: BJP state website hacked by Pakistani hackers. D Mashke, state BJP IT cell head says, "More than 100 websites were hacked in a cyber-attack, our website was one of them. We've registered a complaint. They can't take us head on, that's why they resort to such things" pic.twitter.com/hb7J1xSzOI
— ANI (@ANI) February 21, 2019
14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामात पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदतर्फे आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये भारताचे 40 हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अघोषित युद्ध सुरू आहे.