SBI ग्राहकांसाठी बँकेने केलं ट्विट, 'हे' काम केल्यास होणार नाही कुठलाही त्रास

तुमचं एसबीआय बँकेत अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी एक खास ट्विट केलं आहे. एसबीआयने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरु ट्विट करत ग्राहकांना माहिती दिली आहे.

Sunil Desale Updated: Mar 27, 2018, 01:32 PM IST
SBI ग्राहकांसाठी बँकेने केलं ट्विट, 'हे' काम केल्यास होणार नाही कुठलाही त्रास title=
File Photo

नवी दिल्ली : तुमचं एसबीआय बँकेत अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी एक खास ट्विट केलं आहे. एसबीआयने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरु ट्विट करत ग्राहकांना माहिती दिली आहे.

एसबीआयने ३१ मार्चपूर्वी आपल्या ग्राहकांना महत्वपूर्ण सूचना दिली आहे. गेल्या वर्षीय भारतीय महिला बँक, स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर (SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP) आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT) या बँकाचं एसबीआयमध्ये विलय करण्यात आलं.

अर्ज केल्यास होणार नाही कुठलाही त्रास

वरील बँकांपैकी कुठल्याही बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग तुम्हाला तुमच्याकडील जुनं पासबूक बदलावं लागणार आहे. एसबीआयने २७ मार्च रोजी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये एसबीआयने म्हटलं की, एसबीआय आणि इतर असोसिएट बँकांच्या ग्राहकांना कळवण्यात येतं की त्यांनी नव्या चेकबूकसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा. जुने e-AB/BMB चेक बूक ३१ मार्च नंतर मान्य केले जाणार नाहीत.

यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंतची होती वेळ 

या बँकांचं एसबीआयमध्ये विलय झाल्यानंतर एसबीआयने या बँकांचं चेकबूक बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर बँकेकडून हा कालावधी वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आला. ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता एसबीआयने नवं चेकबूक घेण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आणि ३१ मार्च केली. आता या अंतिम तारीखेची पुन्हा ग्राहकांना आठवण करुन देण्यासाठी एसबीआयने ट्विट केलं आहे.

SBI, sbi associate banks, Bharatiya Mahila Bank, State Bank of Patiala, state bank of mysore

असा करा अर्ज

एसबीआयच्या नव्या चेक बूकसाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा ATM च्या माध्यमातून अर्ज करु शकता. यासोबतच तुम्ही संबंधित बँकेच्या शाखेत जावून नव्या चेकबूकसाठी अर्ज करु शकता.