भारतातील सर्वात मोठा बस डेपो, याच्यासमोर एअरपोर्टही छोटा वाटेल; 3000 वाहनांसाठी पार्किंग, 3 हॉटेल, शॉपिंग मॉल आणि बरंच काही...

Chennai Mofussil Bus Terminus : आशियातील सर्वात मोठा बस डेपो भारतात आहे. येथून  एकावेळी 180 बसेस सुटतात येथे 3000 वाहनांसाठी डबल डेकर पार्किंगची सोय आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 21, 2025, 08:05 PM IST
भारतातील सर्वात मोठा बस डेपो, याच्यासमोर एअरपोर्टही छोटा वाटेल; 3000 वाहनांसाठी पार्किंग, 3 हॉटेल, शॉपिंग मॉल आणि बरंच काही... title=

Chennai Mofussil Bus Terminus Biggest Bus Stand in India : बस प्रवास हा जगभरात सर्वास्त स्वत आणि सोईस्कर असे वाहकतुकीचे माध्यम आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा  बस डेपो आपल्या भारतात आहे. या बस डेपोटून एकाच वेळेस 180 बसेस सुटतात. तर जवळपास 100 बसेससाठी येथे पार्किंग आहे. येथे 3000 वाहनांसाठी डबल डेकर पार्किंग आहे.  हॉटेल, शॉपिंग मॉलसह सर्व सुविधा येथे मिळतात. जाणून घेऊया कुठे आहे हा बस डेपो.

संपूर्ण आशियातील सर्वात मोठे बस टर्मिनल आपल्या भारतात आहे. चेन्नई मोफसिल बस टर्मिनल असे भारतातील या सर्वात मोठ्या बस डेपोचे नाव आहे. चेन्नईचे हे बसस्थानक जवळपास 37 एकरात पसरलेले आहे. यामुळेत हे आशियातील सर्वात मोठे बस टर्मिनल म्हणून ओळखले जाते. यासोबतच या टर्मिनलला त्याच्या गुणवत्तेसाठी आयएसओ प्रमाणपत्रही मिळाले आहे.  

या बस टर्मिनलमधुन  दिवसाला दोन हजार बसेसची वाहतूक होते. या बस टर्मिनलची सुमारे दोन लाख प्रवासी हातळण्याची क्षमता आहे. येथे दररोज दोन लाखांहून अधिक प्रवासी येतात. यासोबतच एकाच वेळी पाचशेहून अधिक बसेस चालविल्या जातात, दिवसभरात दोन हजारांहून अधिक बसेस येथून चालवल्या जातात. 

हे बस टर्मिनल इतके मोठे आहे की येथे लोकांना राहण्यासाठी तीन हॉटेल्स आहेत. याशिवाय 10 लॉकर रूम, सुपर मार्केट, अनेक भोजनालय आणि एटीएमसह अनेक सुविधा आहेत.  इतकचं नाही तर येथे  3000 वाहनांसाठी डबल डेकर पार्किंगची सुविधा देखील आहे. 2018 मध्ये, या बसस्थानकाचे नाव बदलून पुराची थलाईवार डॉ. एमजीआर बस स्टँड असे करण्यात आले.  चेन्नई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (CMDA) ने हे बस स्थानक बांधले आहे.