मित्राने 2000 उसने मागितले, अकाऊंट पाहतो तर काय!!! Rs 7,53,00,00,000 Credited your Account

Rs 753 Crore In Chennai Man Bank Account : तमिळनाडूमधून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चक्क 753 कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Oct 8, 2023, 08:13 PM IST
मित्राने 2000 उसने मागितले, अकाऊंट पाहतो तर काय!!! Rs 7,53,00,00,000 Credited your Account title=
753 crore in bank account

Chennai Shocking News : गेल्या काही दिवसात तमिळनाडूमधून (Tamil Nadu news) धक्कादायक तीन घटना समोर आल्या आहे. काही दिवसापूर्वी एका कॅब ड्राईव्हरच्या अकाऊंटमध्ये 9 हजार कोटी जमा झाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता चेन्नईतील फार्मेसी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात (Bank Account) अचानक करोडो रुपये जमा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आल्याचं समोर आलंय. आत्तापर्यंत अशा तीन घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता लोकांची बँकेत वर्दळ देखील वाढल्याचं दिसून येतंय.

नेमकं काय झालं?

ज्या व्यक्तीच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत, त्यांच्या मित्राने 2000 रुपयांचे उसने पैसे मागितले होते. त्या व्यक्तीने मोबाईल बँकिंगद्वारे त्याच्या मित्राला 2000 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आपल्या खात्यात नक्की किती रक्कम राहिली? याची माहिती जाणून घेण्यासाठी त्याने बँक बॅलेन्स तपासला. जेव्हा त्याने बॅंक बॅलन्स तपासले तेव्हा त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये आढळले. एवढा मोठा आकडा पाहून त्याला धक्काच बसला. ही घटना शनिवारी घडल्याचं समोर आलंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चेन्नईतील फार्मसी कर्मचारी मोहम्मद इद्रिससोबत घडली आहे. इद्रिसने सांगितलं की, मित्राला पैसे पाठवताना मला याबद्दल माहिती कळाली. अचानक माझ्या खात्यात एवढे पैसे कुढून आले हे मला माहिती नाहीत, असं त्याने सांगितलं आहे. खात्यात कोट्यवधी रुपयांची बँक शिल्लक असल्याची माहिती मिळाल्यावर इद्रिस यांनी त्यांच्या बँकेला (कोटक महिंद्रा) याची माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर इद्रिसचे बँक खातं बँकेने काही काळासाठी गोठवलं आहे.

आणखी वाचा - पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! पाहा 133 सेकंदाचा थरारक व्हिडीओ

दरम्यान, तमिळनाडूमधील ही तिसरी घटना असल्याचं समोर आलंय. चेन्नईतील राजकुमार नावाच्या कॅब ड्रायव्हरच्या खात्यात चुकून 9 हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले होते. चौकशीत ही बँकेची चूक असल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर तामिळनाड मर्कंटाइल बँकेच्या सीईओने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर त्याआधी तंजावर येथील गणेशन नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात 756 कोटी रुपये अचानक पोहोचले होते.