मुंबई : पॅन कार्ड आज एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. आयटी रिटर्न भरायचा असो की बँकेत खातं उघडायचं असो तुम्हाला पॅनकार्डची आवश्यकता असते. आर्थिक वर्षात पॅनकार्डची आवश्यकता सगळीकडेच भासते. आता सरकारने शॉपिंगसाठी देखील पॅनकार्ड अनिवार्य केलं आहे. पॅन कार्ड तुमचं फायनँशियल स्टेटस दाखवतो. पण जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर...? सरकारने काही पॅन कार्ड बोगस असल्याच्या संशयावरुन रद्द केली आहेत. देश भरातील जवळपास 11.4 लाख पॅनकार्ड बंद करण्यात आले आहेत. अनेक लोकांचे पॅनकार्ड या कारवाई दरम्यान ब्लॉक करण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे 2 पॅनकार्ड त्यांचे देखील पॅनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. दोन पॅनकार्ड बाळगणाऱ्यांना 10000 दंड देखील बसू शकतो.
जर तुमच्याकडे 2 पॅनकार्ड असतील तर एक कार्ड तुम्ही सरेंडर केलं पाहिजे. 31 जुलैपर्यंत असं नाही केल्यास तुमचे पॅन कार्ड बं केले जाणार आहे. 31 जुलै इनकम टॅक्स रिटर्न फाईल भरण्याची शेवटची तारीख आहे. पॅन कार्ड बंद झालं तर तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे रिटर्न भरतांना तुम्हाला अडचण येऊ शकते. त्य़ामुळे तुमचं कार्ड अॅक्टीव्ह आहे का हे तपासून पाहा.
आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असल्याचं सरकारने सांगितलं आहे. जर तुम्ही ते लिंक केलं नसेल तर तुमचं पॅनकार्ड रद्द होऊ शकतं. 31 जुलै रिटर्न फाईल करण्याची आणि पॅन आणि आधार लिंक करण्याची देखील शेवटची तारीख आहे.
तुमचं पॅनकार्ड अॅक्टिव आहे की नाही हे तपासण्यासाठी आयकर विभागाची ऑनलाईन प्रोसेस आहे. जी खूप सोपी आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर 3 सोप्या स्टेप्सने तुम्ही ते तपासू शकता.
आयकर विभागची वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन Know your phone card वर क्लिक करुन तुमची माहिती भरा.