उर्मिलाने लेझीमच्या तालावर धरला ठेका

उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.

Updated: Apr 6, 2019, 11:35 AM IST
उर्मिलाने लेझीमच्या तालावर धरला ठेका title=

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उर्मिलाला उत्तर मुंबईतून काँग्रेस पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हा आता मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उर्मिला वेगवेगळे फंडे आजमावता दिसत आहे. चारकोप परिसरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू उर्मिला ठरली आहे. यावेळी उर्मिलाने लेझीमच्या तालावर ठेका धरला. सांस्कृतीक महत्व असलेल्या या गुढीपाडवा स्वागतयात्रेत जनमाणसातून राष्ट्ररक्षा हा विषय मांडण्यात आला. या प्रचारा दरम्यान लहानग्यांची गर्दी जमली तेव्हा तिने रंगिला गर्लने चिमुरड्यांसाठी चक्क गाणे गायले. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.

उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिलाच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही लढत अगदीच एकतर्फी होईल असे वाटले होते. पण उर्मिलानं निवडणुकीच्या प्रचारात रंग भरायला सुरूवात केली आहे. मराठी मतदारांशी जेव्हा ती संवाद साधते तेव्हा ती थेट कोकणाशी नातं सांगते. गुजराती मतदारांशी ती गुजराती खाद्यपदार्थांबाबत बोलते. कधी ती रिक्षा चालवून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधतेय. कार्यकर्त्यांसोबत प्रचार करताना तिनं चक्क वडापावचा आस्वाद घेतला. आणि वडापावच्या चवीबाबत दादही दिली. पुन्हा त्यावर चटणी कुठं आहे असे ही विचारले. तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे उमेदवार गुढीपाडवा सणाचा चांगलाच फायदा घेताना दिलत आहेत.