Rice Price in India : केंद्र सरकराने (central Government) बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून तांदळाबाबात (Rice) मोठा निर्णय घेण्यात आला. तांदळाच्या किमती (Inflation) 200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. (central government decision on rice price down in wholesale market)
तुम्हीही रेशन (ration card) खरेदी करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या आताचे नवीनतम दर काय आहेत. सरकारने तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Ban on export of rice) घातली आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनमध्ये अन्न संकट निर्माण होऊ शकते. परिणामी सरकारच्या या निर्णयामुळे भारतात ( Rice Price in India) तांदळाच्या किमतीत घसरण झाली आहे. गेल्यावर्षी 200 लाख टनांहून अधिक तांदळाची निर्यात करण्यात आली. यंदाही आतापर्यंत तांदळाची रेकॉर्ड ब्रेक (export of rice) निर्यात पाहायला मिळत आहे.
तांदूळ किती स्वस्त आहे?
गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात तांदळाच्या भावात 100 ते 200 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारातील भावात अद्याप कोणतीही घसरण झालेली नसली तरी लवकरच किरकोळ बाजारातही तांदळाच्या दरात घट होणार आहे.
तांदळाचे नवीनतम दर तपासा
कन्झ्युमर अफेयर्सच्या वेबसाइटनुसार, 15 सप्टेंबरला किरकोळ बाजारात तांदळाची किंमत 38.34 रुपये प्रति किलो होती. त्याचवेळी महिन्याभरापूर्वी तांदळाचा भाव प्रतिकिलो 37.41 रुपये होता.
भारत हा तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर
चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक बाजारपेठेत भारतातील तांदळाचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे. त्यात ३४.९ लाख टन बासमती तांदूळ होता.
भारतातीय नागरिकांना तांदळाची कमतरता भासू नये
भारतातील चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच देशातील नागरिकांना तांदळाच्या टंचाईला सामोरे जावे लागू नये. महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार तांदूळ आणि ब्राऊन राईसवर 20 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे.