नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, results.cbse.nic.in, results.gov.in, digilocker.gov.in वर विद्यार्थी आणि पालकांना निकाल पाहता येणार आहे.
सीबीएसई 12वीच्या परीक्षेत, यावर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.cbseresults.nic.in इथे निकाल पाहता येणार आहे. यंदा सीबीएसई बारावीचा 92.71% निकाल करता येणार आहे.
कसा पाहायचा निकाल
- CBSE बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in, cbresults.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
- तुम्ही निकालावर क्लीक करा
CBSE Class 12 results | Girls outshine boys with overall pass percentage of 94.54%, while boys secured 91.25% pic.twitter.com/cZqXQEyfAp
— ANI (@ANI) July 22, 2022
- तिथे रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचा बैठक क्रमांक अपलोड करा
- त्यानंतर तुमचा बारावीचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे
- हा निकाल तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकता.
- याशिवाय तुम्ही SMS द्वारेही निकाल पाहू शकता त्यासाठी तुम्हाला cbse12<रोल नंबर> टाईप करून 7738299899 या क्रमांकावर - पाठवायचं आहे. तुम्हाला तुमचा निकाल SMS द्वारे पाहता येईल.