CBSE Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने इयत्ता 11 वी आणि 12वीच्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. शिक्षणाची वाढती गरज आणि विद्यार्थ्यांना समकालीन काळासाठी तयार करणे हे या बदलामागील महत्त्वाचे कारण आहे. CBSE च्या नवीन परीक्षा पॅटर्नचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास आणि गंभीर विचारांना चालना देण्याचे आहे ज्यामध्ये प्रश्न स्वरूपापासून ते मूल्यांकन पॅटर्नपर्यंत विविध डोमेन समाविष्ट आहेत.