CBSE Class 12th Result 2021 | 12 वी चा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा रिझल्ट

विद्यार्थ्यांना विविध माध्यामतून ऑनलाईन पद्धतीने निकाल (CBSE Class 12th  Result 2021) पाहता येणार आहे.   

Updated: Jul 30, 2021, 02:55 PM IST
CBSE Class 12th  Result 2021 | 12 वी चा निकाल जाहीर, असा चेक करा तुमचा रिझल्ट title=

मुंबई :  ज्या दिवसाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा होती, तो दिवस अखेर उजाडला आहे.  CBSE शिक्षण मंडळाचा 12 वीचा निकाल (CBSE Class 12th Result) जाहीर झाला आहे. बारावीचा एकूण  99.37% इतका निकाल लागला आहे.  यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. एकूण 99.67 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर  99.13% मुलांनी बाजी मारली आहे. 12वी चा निकाल लावताना 10वी च्या गुणांनाही महत्तव देण्यात आले आहे. या निकालात दहावीच्या 30 टक्क्यांपर्यंत महत्तव दिलं जाणार आहे. (CBSE Class 12th  Result 2021 class xii result declared know how to check online result in official website) 

ऑनलाईन निकाल कसा  पाहायचा....

सीबीएसईच्या cbseresults.nic.in आणि cbse.gov.in या दोन्ही अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना रिझल्ट टॅब (Result Tab) क्लिक करावं. त्यानंतर निकाल पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कॉम्प्युटरवर दिसेल. विद्यार्थ्यांना निकालाची प्रत डाऊनलोड करुन प्रिंटही घेता येईल.