नवी दिल्ली : फरार घोषित केलेला मद्यसम्राट विजय माल्या याच्या भोवतीचा फास अधिकाअधिक घट्ट होत चालला आहे. सीबीआय आणि ईडीची संयुक्त टीम ब्रिटेनच्या अभियोजन अधिका-यांना माल्याविरोधात पुरावे देणार आहे,
मागील महिन्यात माल्याविरोधात ईडीद्वारे दाखल केलेली चार्जशीटही ब्रिटेनच्या अधिका-यांना सोपविण्यात येणार आहे. तसेच मनी लॉड्रिंगप्रकरणातील माल्ल्याची माहितीही ईडीचे कायदे सल्लागार देणार आहेत. त्याचबरोबर इडीने फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर, मॉरीशस, आयरलँड आणि युएई या देशांकडे माल्याविरोधात तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.