सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल, हुंड्यात Creta गाडी मागितली, मारहाण करत छळ केल्याचा आरोप

हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना चौधरीसह तिचा भाऊ आणि आईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.   

Updated: Feb 4, 2023, 08:20 AM IST
सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल, हुंड्यात Creta गाडी मागितली, मारहाण करत छळ केल्याचा आरोप title=

आपल्या जबरदस्त डान्सने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल (FIR Against Sapna Choudhary) करण्यात आला आहे. सपना चौधरीवर हुंड्यासाठी छळ (Dowry Violence) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सपना चौधऱीसह तिची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

पोलिस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, डान्स क्वीन सपना चौधरीने हुंड्यात क्रेटा (Creta) गाडी मागितली. गाडी मिळाली नाही तेव्ही तिने पीडितेला मारहाण केली. यामध्ये तिची आई आणि भाऊही सहभागी होता. दरम्यान, हे आरोप नेमके कोणी केले आहेत याचा खुलासा झालेला नाही. 

फरीदाबादमधील पलवल महिला पोलीस ठाण्यात सपना आणि तिच्या कुटुंबाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर अद्याप सपना किंवा तिच्या घऱच्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या प्रकरणामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. 

काय आहे प्रकरण?

सपना चौधरी, तिचा भाऊ कर्म आणि आईविरोधात फरीदाबादमधील पलवल येथे हुंड्याची मागणी, मारहाण आणि काही अन्य गंभीर आरोप लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तक्रार सपनाच्या भावाच्या पत्नीने केली आहे. तक्रारीत सपना चौधरीने पीडितेकडे क्रेटा कारची मागणी केल्याची माहिती देण्यात आली आहे. क्रेटा कारची मागणी पूर्ण झाली नसता, पीडितेला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणानंतर सपना चौधरीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

सपनाविरोधात याआधीही अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पलवल येथे राहणाऱ्या महिलेने सपनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने दावा केला होता की, 2018 मध्ये सपनाचा भाऊ कर्ण याच्याशी आपलं लग्न झालं होतं. या लग्नात मुलीच्या कुटुंबाने 42 तोळं सोनं आणि इतर सामान हुंड्यात दिलं होतं. दिल्लीच्या ज्या हॉटेलमध्ये लग्न होणार होतं त्याचं भाडंही 42 लाख होतं. पण लग्नानंतर इतर गोष्टींसाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला असा महिलेचा आरोप होता.