रांची : छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यानं नदीनाल्यांना पूर आलाय. या पुरात अनेक वाहनंही वाहून गेली आहेत. आंबिकापूरजवळच्या ओढ्यात एक कारही वाहून गेलीय. या कारच्या चालकानं वेळीच गाडीबाहेर उडी घेतल्याने तो बचावला आहे. दरम्यान, हरियाणातही पूर आला आहे.
#WATCH A car was washed away in water overflowing from a flooded drain at Kanya Parisar road in Ambikapur, earlier today. A man and his son present in the car were rescued by locals. #Chhattisgarh pic.twitter.com/XNB6qKqXJO
— ANI (@ANI) July 6, 2019
हरियाणाच्या पंचकुलात एक कारचालक कारसह पुराच्या पाण्यात अडकला होता. गाडी चालवत असताना त्याची कार अचानक पुराच्या पाण्यात सापडली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारबाहेर आला मात्र त्याला नदीबाहेर येता येत नव्हतं. त्याच्या सुटकेसाठी पंचकुलातील प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गाडी वाहून जाऊ नये म्हणून नदी किनाऱ्यावरच्या झाडाला ही कार बांधून ठेवण्यात आली होती.
#WATCH A car got stuck in water overflowing from Ghaggar river in Panchkula earlier today. The car was later recovered by locals. #Haryana pic.twitter.com/6OmIkqU4tB
— ANI (@ANI) July 6, 2019