प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या फॉर्च्युनर कारची घराबाहेरुन चोरी

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (Poet Kumar Vishwas) यांनाच चोरट्यांनी मोठा दणका दिला आहे. 

Updated: Feb 15, 2020, 09:13 PM IST
प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या फॉर्च्युनर कारची घराबाहेरुन चोरी title=

गाझियाबाद : दिल्ली-एनसीआरमध्ये चोरट्यांना कसलाही धाक दिसून येत नाही. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद (Ghaziabad)  येथे प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (Poet Kumar Vishwas) यांनाच मोठा दणका दिला आहे. त्यांची कार पळवून नेली. पहाटे साडेपाचच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या फॉर्च्युनर कारला उचलून नेले. (Famous Poet Kumar Vishwas car theft ) या चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास करण्यासाठी काही पथकांची स्थापना केली आहे. 

कुमार विश्वास आपल्या कुटुंबीयांसह वसुंधरा सेक्टर ३ मध्ये राहतात. शनिवारी रात्री काही चोरटे कुमार विश्वास ( Kumar Vishwas)  यांच्या घराबाहेर काळ्या रंगाच्या गाडीतून ते बाहेर गेलेत. तेथे उभी असलेली फॉर्च्युनर कार घेऊन ते फरार झालेत. या चोरीची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सीसीटीव्हीचे चित्रण पाहिले. पोलिसांनी सांगितले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळ्या गाडीतून चोर गेल्याचे दिसत आहे. ते गाडी चोरुन नेत असल्याचे दिसून आले आहे. सध्या या हायप्रोफाईल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. अनेक पोलीस पथके संभाव्य ठिकाणांवरून कारचा शोध घेत आहेत.

कुमार विश्वास यांचे व्यवस्थापक वरदान शर्मा यांच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवत आहेत. लवकरच आरोपींना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा माहिती पोलिसांनी दिली.

कुमार विश्वास हे एक प्रसिद्ध कवी आहेत. कुमार विश्वास देश-विदेशात आपल्या कवितांचा कार्यरत सादर करत असतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीनंतर ते आम आदमी पक्षाशी जोडले गेले होते. आता पूर्णवेळ कवितांचा कार्यक्रम करत आहेत.