भोपाळ : मध्य प्रदेश (MP)पर्यटन विकास महामंडळाच्या (Tourism Development Corporation) विभागीय व्यवस्थापकांवर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पीडितेचे पर्यटन विकास महामंडळाच्या प्रकल्पात कॅन्टीन आहे. या महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती आपले बिल मंजूर करण्यासाठी रीजनल मॅनेजरकडे गेली, तेव्हा त्याने तिला मैत्री करण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता.
महिलेच्या तक्रारीवरून आरोपी रीजनल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळ येथील जहांगीराबाद पोलिस स्टेशनचे इंचार्ज वीरेंद्रसिंग चौहान म्हणाले की, ही बाब पाच महिन्यांपूर्वीची आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
अकाउंटन्टच्या चुकांमुळे कॅन्टीनमधील काही पैशांचं नुकसान झालं असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ती रीजनल मॅनेजर एन के स्वर्णकार यांना भेटायला गेली.
1 नोव्हेंबर 2020 रोजी जेव्हा ती मॅनेजर स्वर्णकारला भेटायला गेली, तेव्हा त्याने अश्लील कृत्ये केली आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. तिच्याकडून नकार मिळाल्यामुळे तिचा कॉन्ट्रॅक्टचे नूतनीकरणही झाले नाही.
या महिलेचा आरोप आहे की, मॅनेजरने तिला सांगितले की, "तू खूप सुंदर आहेस आणि आकर्षक आहे. माझ्या हातात अनेक प्रकल्प आहेत. तिथेही तुझ्यासाठी दुकान उघडून देईन. पुढे आपण समजदार आहात. जर तुम्ही मला साथ दिली तर मी तुम्हाला साथ देईन."
दुसरीकडे, रीजनल मॅनेजरने महिलेचा आरोप फेटाळून लावला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅनेजरने या घटनेबद्दल खुलासा करत सांगितले की, "या महिलेने दुकानाचे भाडे अजूनही भरलेले नाही. तिने डिसेंबर 2019 पासून दुकानाचे भाडे दिले नाही. 75 हजार रुपयांच्या थकबाकीसाठी त्यांना अनेक वेळा पत्र पाठविण्यात आले. यानंतरही तिने भाडे न भरल्याने स्वत: ला वाचवण्यासाठी आता ती माझ्यावर आरोप करीत आहे."